Kumbh Mela 2021: हरिद्वार येथील कुंभमेळा ठरतोय Coronavirus उद्रेकाचे कारण, दोन दिवसांमध्ये 1,000 जण COVID 19 संक्रमित
देशात कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्णांना बेड मिळेना झालेत. लस आणि औषधांचा तुटवडा पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याऐवजी भक्तगण मोठ्या प्रमाणावर हरीद्वारला पोहोचत आहेत.
उत्तराखंड राज्यातील हरिवद्वार हे सध्या साधू-संत आणि भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. हरिद्वार येथे कुंभमेळा (Kumbh Mela 2021) भरला आहे. कुंभमेळ्याच्या गर्दीत कोरोना नियमांचे उल्लंघन सऱ्हासपणे होऊ लागल्याने कोरोना संक्रमितांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. इतकी की गेल्या दोन दिवसांमध्ये हरिद्वारमध्ये 1000 जण कोरोना व्हायरस (Coronavirus ) संक्रमित झाले आहेत. त्यामुळे शहरातील सक्रिय कोविड 19 (COVID 19 ) रुग्णांची संख्या 2,812 इतकी झाली आहे. सोमवारी (12 एप्रिल) हरीद्वारमध्ये नवे 408 कोरोना संक्रमित आढळून आले होते. तर संपूर्ण उत्तराखंड राज्याबाबत बोलायचे तर पाठिमागील 24 तासात 1925 नवे कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
हरिद्वारमध्ये सध्या कुंभमेळा सुरु आहे. देशात कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्णांना बेड मिळेना झालेत. लस आणि औषधांचा तुटवडा पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याऐवजी भक्तगण मोठ्या प्रमाणावर हरीद्वारला पोहोचत आहेत. मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचेही उल्लंघन होताना दिसते आहे. (हेही वाचा, Haridwar Kumbh Mela 2021: यंदा हरिद्वार मधील कुंभमेळा एप्रिल महिन्यात अवघ्या 30 दिवसांचा)
सोमवारी शाही स्नान होते. या वेळी सुमारे एक लाख लोकांनी गंगा नदीत स्नान केले. या वेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरातून प्रतिदिन कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 1.5 लाख इतकी पुढे येत आहे. असे असताना भक्तांसह सुमारे 13 आखाड्यांशी संबंधित हजारो साधू मोठ्या संख्येने कुंभ मेळ्यात पोहोचत आहेत. कुंभमेळ्यात पोहोचलेल्या अनेकांचे म्हणने असे की, घाबरण्याचे कारण नाही कारण उत्तराखंड सरकारने आरटी-पीसीआर टेस्ट सर्वांना बंधनकारक केली आहे.
दरम्यान कुंभमेळ्याच्या ठिकाणी सर्व ठिकाणी आरोग्याची काळजी घेण्याबाबत आणि सोशल डिस्टन्सींग पाळण्याबाबत पोस्टर पाहायला मिळत आहेत. कोविड 19 नियमांचे पालन करावे असे अवाहनही अनेक ठिकाणी केले जात आहे.