RR vs LSG, Jaipur Weather Forecast: राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स टाटा सामन्यापूर्वी जयपूरचे हवामानाबद्दल घ्या जाणून

हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार, शनिवारी जयपूरमध्ये पावसाची शक्यता नाही. दुपारी तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे, तर रात्री ते 31 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते.

जयपुर सवाई मानसिंह स्टेडियम (Image: @dharma_sastra6/Twitter)

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Indian Premier League 2025: आयपीएल 2025 (IPL)चा 36 वा सामना 18 एप्रिल (शनिवार) रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. 2008 च्या विजेत्या राजस्थान रॉयल्सची या हंगामात कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत सातपैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत, तर पाचमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा शेवटचा सामना सुपर ओव्हरमध्ये गमावल्यानंतर संघाचे मनोबल खचले आहे, त्यामुळे त्यांना या सामन्यात विजय मिळवून पुनरागमन करायचे आहे.

दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला तरी लखनौ सुपर जायंट्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये चांगल्या स्थितीत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील एलएसजीने आतापर्यंत सातपैकी चार सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत, ज्यामुळे ते पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहेत. राजस्थानविरुद्धचा हा सामना लखनौसाठी महत्त्वाचा असेल कारण विजय त्यांना गुणतालिकेत त्यांचे स्थान मजबूत करण्यास मदत करू शकतो. जयपूरमधील हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे आणि पावसाचा कोणताही इशारा नाही, त्यामुळे सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

जयपूर हवामान स्थिती

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल 2025 चा हा रोमांचक सामना 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता भारतीय वेळेनुसार खेळला जाईल. हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार, शनिवारी जयपूरमध्ये पावसाची शक्यता नाही. दुपारी तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे, तर रात्री ते 31 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. उष्णता निश्चितच त्रासदायक असू शकते.

सवाई मानसिंग स्टेडियम खेळपट्टी अहवाल

सवाई मानसिंग स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, ती पारंपारिकपणे फलंदाजांना अनुकूल राहिली आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील या सामन्यातही अशीच खेळपट्टी अपेक्षित आहे. ही खेळपट्टी संतुलित मानला जातो. जिथे वेगवान गोलंदाजांसह फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळते. या खेळपट्टीवर पाठलाग करणाऱ्या संघाला अनेकदा फायदा झाला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement