धक्कादायक! नवविवाहित महिलेचे लग्नाच्या दुस-याच दिवशी अपहरण करुन केला सामूहिक बलात्कार; आरोपींचा शोध सुरु
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, हपूर जिल्ह्यात एका नवविवाहित तरुणीचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
देशातील बलात्काराच्या घटनांचे स्वरुप लक्षात घेता याविरोधात कठोर कायदा यावा यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. त्यात दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारातील (Gang Rape) आरोपींना येत्या 22 जानेवारीला देण्यात येणारी फाशीची शिक्षा हा त्यातीलच महत्त्वाचा निर्णय. असे असतानाच देखील हपूर (Hapur) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, नवविवाहित तरुणीचे लग्नाच्या दुस-याच दिवशी अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, हपूर जिल्ह्यात एका नवविवाहित तरुणीचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस अधीक्षक राजेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे 17 जानेवारीला लग्न झाले होते आणि लग्नाच्या दुस-याच दिवशी आरोपींनी तिचे अपहरण केले. रविवारी सकाळी ही पीडित तरुणी अत्यावस्थ अवस्थेत सापडली. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले.
ANI चे ट्विट:
हेदेखील वाचा- हैदराबाद: एन्काउंटर मध्ये ठार झालेल्या आरोपीची पत्नी म्हणते,'मलाही गोळ्या मारून संपवून टाका'
सदर गुन्ह्यातील आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हे अपहरण करणारे इसम कोण होते याचीही पोलीस चौकशी करत आहे.
तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्ली येथे 2012 मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी पटियाला हाऊस कोर्ट येथे सुनावणी झाली. 22जानेवारी सकाली 7 वाजता आरोपींना शिक्षा दिली जाणार आहे. तर या प्रकरणी आता पर्यंत दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळून लावण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्याभराच्या दरम्यान सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने एका आरोपीबाबत दाखल केलेली याचिका सुद्धा फेटाळून लावली. निर्भयाच्या प्रकरणी आरोपी मुकेश, वियन, पवन आणि अक्षय यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान एकाने तिहार जेलमध्ये आत्महत्या करून आपले जीवन संपवले. पण आता डेथ वॉरंट जारी होण्याच्या निर्णय घेण्यात आला.