Kerala Police s24 Ultra Zoom Action: केरळ पोलिसांनी Samsung s24 Ultra फोनचा कॅमेरा वापरून गुन्हेगारांना पकडले; वाहतूक नियमांचे केले होते उल्लंघन, चालान जारी
केरळमधील (kerala) एका नवीन प्रकरणात पोलिसांनी प्रसंगावधान राखून गुन्हेगारांना पकडण्यासाठी अजून एका नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याचे दिसून आले आहे. जर तुम्ही ट्रॅफिक कायद्याचे उल्लंघन करून दंड चुकवण्याचा विचार अथवा प्रयत्न करत असाल तर, तुम्हाला याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
Kerala Police s24 Ultra Zoom Action: सध्याच्या काळात रस्त्यावर नागरिकांकडून अनेक वाहतूक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन होते. यामुळे मोठे अपघातही घडतात. वाहतूक विभागाने अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्पीड कॅम, नंबर प्लेट स्कॅनर आणि इतर अनेक प्रगत तंत्रज्ञान आणले आहे. मात्र, इतके करूनही अनेक लोक कायदा मोडल्याबद्दल वाहतूक दंड चुकवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करतात. यासाठी अनेक क्लुप्त्या वापरतात. अशाप्रकारे पोलिसांसाठी वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी वाटते तितकी सोपी गोष्ट राहिली नाही.
मात्र, केरळमधील (kerala) एका नवीन प्रकरणात पोलिसांनी प्रसंगावधान राखून गुन्हेगारांना पकडण्यासाठी अजून एका नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याचे दिसून आले आहे. जर तुम्ही ट्रॅफिक कायद्याचे उल्लंघन करून दंड चुकवण्याचा विचार अथवा प्रयत्न करत असाल तर, तुम्हाला याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
जाणून घ्या काय आहे तंत्रज्ञान-
तर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये केरळ मोटार वाहन विभागाच्या ट्रॅफिक पोलिसाने ट्रॅफिक उल्लंघन करणाऱ्याला पकडण्यासाठी आणि चालान देण्यासाठी हाय डेफिनेशन स्मार्टफोन कॅमेरा वापरला होता. या कॅमेराचा वापर करून गुन्हेगाराच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो घेण्यात आला.
काय होते प्रकरण?
केरळमध्ये जर तुम्ही मोटरसायकलवरून प्रवास करत असाल, तर चालक आणि त्याच्यामागे बसलेली व्यक्ती अशा दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. या प्रकरणात, व्हायरल झालेल्या घटनेत रॉयल एनफिल्ड मोटारचालक एका व्यक्तीसोबत प्रवास करत होता. चालकाने हेल्मेट घातले असले तरी, मागे बसलेल्या व्यक्तीकडे हेल्मेट नव्हते. त्यामुळे दंड आकारला जाऊ नये यासाठी आपली नंबर प्लेट लपवण्यासाठी चालकाच्या मागे बसलेल्या व्यक्तीने अजून मागे झुकून नंबर प्लेट हाताने लपवण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा: Kerala Shocker: केरळमध्ये 11वीच्या विद्यार्थिनीवर शिकवणी शिक्षकाकडून बलात्कार; न्यायालयाने सुनावली 111 वर्षांची शिक्षा)
केरळ पोलिसांनी Samsung s24 Ultra फोनचा कॅमेरा वापरून गुन्हेगारांना पकडले-
Kerala Police using Samsung phone camera to identify violatorsbyu/Rangannan1 inKerala
परंतु केरळ ट्रॅफिक पोलिसाने त्याच्या सॅमसंग S24 अल्ट्राचा वापर करून नंबर प्लेटवर झूम करून त्याचा फोटो घेतला. उच्च श्रेणीतील या स्मार्टफोनमध्ये उच्च झूमिंग सक्षम असलेला चांगला कॅमेरा असल्याने, पोलिसांना गुन्हेगाराची नंबर प्लेट ओळखण्यात आणि त्याला दंड आकारण्यात मदत झाली. अनेक अपराधी दंड टाळण्यासाठी घटनास्थळावरून त्वरीत पलायन करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा उत्तम फोनच्या उत्तम कॅमेरामुळे वाहतूक पोलीस त्यांना पकडू शकतील. ही घटना व्हायरल झाल्यामुळे, सरकारने चालान जारी करण्यासाठी पोलिसांना चांगले झूमिंग स्मार्टफोन दिले पाहिजेत, अशी मागणी होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)