केरळ: कॉलेजमध्ये बुरख्यावर बंदी, मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे आदेश

केरळ (Kerala) येथील मुस्लिम कॉलेजमध्ये सुद्धा बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आल्याने त्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु झाल्या आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

श्रीलंकेत (Sri Lanka) इस्टर डे दिवशी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 300 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर तेथील राष्ट्रपतींनी बुरखा, नकाब किंवा चेहरा झाकणारी कोणतीही गोष्ट वापरण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर आता केरळ (Kerala) येथील मुस्लिम कॉलेजमध्ये सुद्धा बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आल्याने त्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु झाल्या आहेत.

मुस्लिम एज्युकेशन सोसायटी ही प्रगतीशील समूह असून अनेक व्यावसायिक कॉलेजसह शिक्षण संस्था चालवल्या जातात. तर कोझिकोडे येथील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींनी बुरखा किंवा चेहरा झाकणारे कोणतेही वस्र घालून येऊ नये असे सांगण्यात आले आहे.(श्रीलंकेत बॉम्ब स्फोट हल्ल्यानंतर बुरखा- नकाबवर बंदी, राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांचा आदेश)

मात्र रुढीवादी मुस्लिमांनी संगठना आणि विद्वानांनी या आदेशाबद्दल विरोध दर्शवला आहे. तसेच कॉलेजने दिलेल्या बुरख्याबद्दलच्या निर्णयाचा आदेश गैर इस्लामिक असल्याचे म्हटले आहे. तर इस्लामिक धर्मातील महिलांच्या शरीराचे कोणतेही अंग दिसू नये म्हणून बुरखा घातला जातो असे रुढीवादी संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे एसईएसला बुरख्यावर बंदी घालण्याचा अधिकार नसल्याचे ही म्हटले जात आहे.