Kerala Flood: केरळमध्ये आलेल्या पुरात 33 जणांचा बळी, 11 जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जाहीर
केरळमध्ये पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे. यामध्ये काहींची घरे उद्धवस्त होण्यासह नागरिकांचा बळी सुद्धा गेला आहे. राज्यात मृतांचा आकडा 35 वर पोहचला आहे
Kerala Flood: केरळमध्ये तुफान पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना सुरुच आहे. केरळमध्ये पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे. यामध्ये काहींची घरे उद्धवस्त होण्यासह नागरिकांचा बळी सुद्धा गेला आहे. राज्यात मृतांचा आकडा 35 वर पोहचला आहे. तर दक्षिण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आयएमडीने बुधावारी पुरामुळे फटका बसलेल्या 11 जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जाहीर केला आहे. त्याचसोबत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोक्कयार मध्ये एनडीआरएफच्या पथकाने एका 3 वर्षीय मुलाचा मृतदेह बाहेर काढला. तसेच अद्याप बेपत्ता असलेल्या दोन जणांचा तपास केला जात आहे. कोट्टायच्या कवाली आणि प्लापल्ली मध्ये दोन विविध भूस्खलनात 12 लोकांचा मृत्यू झाल्याची संख्या वाढून 15 वर पोहचली आहे. तर तीन जण बुडून केले आहेत. कवालीच्या सेंट मेरी चर्चमध्ये सोमवारी तीन मुलांसह एकाच परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने त्यांना पुरले गेले.(दिल्ली येथील LNJP Hospital अतिदक्षता विभागाला लागलेली आग आटोक्यात, कोणतीही जीवित हानी नाही)
पुर आणि भूस्खलनामुळे इडुक्की मध्ये मुंडाकायम परिसारातील काही नागरिक बेघर झाले आहेत. दरम्यान, सोमवारी पावसाचा जोर कमी झाला पण काही ठिकाणी अद्याप ही पाऊस पडत आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अधिकाऱ्यांनी 10 बांधावर रेड अलर्ट जाहीर केला आहे.मंत्र्यांनी असे म्हटले की, कक्की बांधाचे स्लुइस गेट खोलल्यानंतर पंबा नदीमध्ये पाण्याचा स्तर कमीत कमी 15 सेमी वाढला गेला आहे. त्यामुळे धार्मिक स्थळासाठी ही स्थिती योग्य नाही. अशातच मंदिरात येणाऱ्या भाविकांना पुन्हा मनाई करण्यात आली आहे.