Air India flight Skidded Watch Video: केरळमधील कोझीकोडच्या करिपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, पाहा व्हिडिओ
राष्ट्रीय अपत्ती निवारण दल (NDRF) घटनास्थळी पोहोचले असून, मदत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली आहे. आवश्यक ती सर्व मदत पोहोचवली जात आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली आहे.
Kozhikode Air India Flight Skidded Watch Video: केरळ (Kerala) राज्यात असलेल्या कोझिकोड (Kozhikode) येथील करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (aripur Airport) एअर इंडिया (Air India) कंपनीच्या IX-1344 या विमानाला भीषण अपघात झाला आहे. दुबईहून आलेल्या या विमानात सहा क्रू मेंबर आणि इतर प्रवासी असे सर्वजण मिळून 144 जण आहेत, असे वृत्त एएनआय या वृत्तावाहीणीने दिले आहे. विमानतळावर लँड होताना हे विमान घसरले आणि अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही पुढे आला आहे.
दुबईहून आलेल्या विमानाचा अपघात झाल्याच्या वृत्ताला करीपूर विमानतळ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. केरळमध्ये आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे वातावरण अंधारमय बनले होते. त्यामुळे वैमानिकाला अंदाज आला नसल्याचे प्राथमिक माहितीत बोलले जात आहे. (हेही वाचा, Kerala Flight Accident: कोझिकोड येथे Air India चे विमान धावपट्टीवर उतरणा घसरले; वैमानिकाचा मृत्त्यू, मदतकार्य सुरु)
दरम्यान, राष्ट्रीय अपत्ती निवारण दल (NDRF) घटनास्थळी पोहोचले असून, मदत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली आहे. आवश्यक ती सर्व मदत पोहोचवली जात आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली आहे.
एएनआय ट्विट
विमान अपघाताची माहिती मिळताच कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीसीजे) येथे अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफला सूचना देण्यात आलेल्या आहेत. आवश्यक ती सर्व मदत तातडीने पोहोचवली जात, असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पनरयी विजयन यांनी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)