Medical Negligence: डॉक्टरांकडून चुकीचे इंजेक्शन; महिलेचा मृत्यू; केरळ राज्यातील घटना
केरळमधील (Kerala) मलयिन्कीझू येथील कृष्णा थँकप्पन (Krishna Thankappan) नावाच्या 28 वर्षीय महिलेचा ठरल्याने पाच दिवसांपूर्वी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत्यूनंतर राजकीय आणि वैद्यकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. डॉक्टरांकडून कथीतरित्या चुकीचे इंजेक्शन दिल्याने या महिलेचा मृत्यू (Woman Dies After Receiving Wrong Injection) झाल्याचे बोलले जात आहे.
केरळमधील (Kerala) मलयिन्कीझू येथील कृष्णा थँकप्पन (Krishna Thankappan) नावाच्या 28 वर्षीय महिलेचा ठरल्याने पाच दिवसांपूर्वी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत्यूनंतर राजकीय आणि वैद्यकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. डॉक्टरांकडून कथीतरित्या चुकीचे इंजेक्शन दिल्याने या महिलेचा मृत्यू (Woman Dies After Receiving Wrong Injection) झाल्याचे बोलले जात आहे. कृष्णा यांचे तिरुवनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, निष्काळजीपणा (Medical Negligence) घडल्याने कृष्णा पाच दिवस बेशुद्ध होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कटुंबीयांनी नेयट्टींकारा जनरल हॉस्पिटलमधील डॉ. विनू यांच्यावर किडनी स्टोनवर उपचार करताना चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप केला.
कृष्णाची प्रकृती बिघडल्याने आणि ती बेशुद्ध पडल्यानंतर तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिचे पती, शरथ, यांनी डॉ. विनू विरुद्ध तक्रार दाखल केली. नेयत्टिनकारा पोलिसांनी कृष्णा यांच्या पतीद्वारे प्राप्त तक्रीरीच्याआधारे भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 125 अंतर्गत गुन्हा नोंदवला. हे कलम जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृत्यांशी संबंधित आहे. (हेही वाचा, Kerala: केरळमध्ये निपाह व्हायरसची लागण झालेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; उपचारादरम्यान आला हृदयविकाराचा झटका)
KGMOA कडून कुटुंबीयांच्या आरोपाचे खंडण
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, कृष्णाला ऍलर्जीची समस्या होती आणि डॉ. विनू यांनी ऍलर्जी चाचणी न करता इंजेक्शन दिले. ज्यामुळे औषधाची तत्काळ रिएक्शन आली आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, केरळ गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर्स असोसिएशन (KGMOA) ने कुटुंबाच्या आरोपांचे खंडन केले. केजीएमओएने म्हटले की, हे इंजेक्शन म्हणजे पोटाच्या समस्यांसाठी एक मानक उपचार आहे. असोसिएशनने असे सुचवले की ॲनाफिलेक्सिस, एक तीव्र ऍलर्जीक प्रतिक्रिया, कृष्णाच्या स्थितीस कारणीभूत ठरू शकते आणि उपचारात निष्काळजीपणा मानला जाऊ नये. (हेही वाचा -Nipah Virus Outbreak in Kerala: केरळमध्ये निपाह व्हायरसचे संकट अद्याप कायम; मलप्पुरममध्ये 14 वर्षांच्या मुलाची चाचणी सकारात्मक)
शशी थरुर यांच्याकडून प्रकरणाची दखल
दरम्यान, तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी दु:ख व्यक्त केले आणि सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
वैद्यकीय निष्काळजीपणा (Medical Negligence)
वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणजे काय? निष्काळजीपणा म्हणजे फक्त योग्य काळजी घेण्यात अपयश. जेव्हा एखादा डॉक्टर त्याच्या किंवा तिच्या व्यवसायाच्या मानकांनुसार कार्य करण्यास अपयशी ठरतो तेव्हा वैद्यकीय निष्काळजीपणा झाला असे मानले जाते. वैद्यकीय निष्काळजीपणासाठी मूलभूत तत्त्व म्हणजे BOLAM नियम. ज्यात असे नमूद केले आहे की, निष्काळजीपणाचे मानक सामान्य कुशल व्यक्तीने विशेष कौशल्य असल्याचा दावा करणे. भारतात भारतीय न्याय संहिताल लागू होण्यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये आयपीसीच्या कलम 304A चा वापर वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांमध्ये केला जाऊ शकत होता. ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. या तरतुदीमुळे दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)