केरळचे मुख्यमंत्री Pinarayi Vijayan यांच्या कन्येचा 15 जून रोजी विवाह; जाणून घ्या कोण आहेत पिनाराई विजयन यांचे होणारे जावई

सीपीआय-एम युवा संघटनेच्या डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद रियाझ (Mohamad Riyaz) यांच्याशी ती लग्न करत आहे.

वीणा व मोहम्मद रियाझ (संग्रहित संपादित प्रतिमा)

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांची कन्या वीणा (Veena) लग्नाच्या बंधनात अडकत आहे. सीपीआय-एम युवा संघटनेच्या डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद रियाझ (Mohamad Riyaz) यांच्याशी ती लग्न करत आहे. 15 जून रोजी हा लग्न सोहळा पार पडत आहे. या लग्नात दोन्ही कुटुंबातील काही खास लोकच सहभागी होतील. दोघांची लग्नाची नोंद आधीच झाली आहे, हा एक साधा समारंभ असल्याची माहिती मिळत आहे. वीणा आणि रियाज दोघांचे घटस्फोट झाले असून, दोघांचे हे दुसरे लग्न आहे. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मोहम्मद रियाझ हे एक विद्यार्थी नेते असून, वीणा बंगळूरमधील स्टार्टअप फर्मची व्यवस्थापकीय संचालक आहे. मोहम्मद रियाझ हे केरळमधील कोझिकोड येथील रहिवासी असून, सीपीएम राज्य समितीचे सदस्य आहेत.

पहिल्या लग्नापासून वीणाला मुलगा आहे तर रियाझही दोन मुलांचा पिता आहे. डीवायएफआयच्या एका नेत्याने सांगितले की, रियाझ आणि वीणा बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. जवळजवळ पाच वर्षांपूर्वी दोघांचे घटस्फोट झाले व दोघांनीही आता आपली मैत्री नात्यात बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविद्यालयीन काळापासूनच राजकारणात आलेल्या रियाझने 2009 मध्ये कोझिकोड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र ते कॉंग्रेसच्या एमके राघवन यांच्याविरुद्ध निवडणूकीत पराभूत झाले. ते डीवायएफआयचे पहिले राष्ट्रीय सहसचिव होते. 2017 मध्ये, त्यांना डीवायएफआय चे अध्यक्षपद मिळाले. त्यांचे वडील पीएम अब्दुल खादर हे आयपीएस अधिकारी होते. काका पीके मोईडेनकुट्टी 1941 मध्ये केरळ कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. (हेही वाचा: भारतात पहिल्यांदाच कोरोना विषाणू सक्रीय रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ; देशाचा Recovery Rate 48.88 टक्के)

तर, 37 वर्षीय वीणा बंगळुरूमध्ये एक्सालॉजिक नावाची सॉफ्टवेअर कंपनी चालवते. यापूर्वी तिने ओरॅकल येथे आठ वर्षे काम केले आहे. या व्यतिरिक्त तिने आरपी टेकसॉफ्टमध्ये दोन वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. 2015 मध्ये तिने आपली स्टार्टअप कंपनी सुरू केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif