Kerala News: तिरुअनंतपुरमच्या अमायझंजन कालव्यात एक स्वच्छता कर्मचारी बेपत्ता, बचावकार्य सुरू
प्लास्टिक कचरा काढण्यासाठी कामगार कालव्यात उतरले होते.
केरळची राजधानी तिरुवनंतपुरमच्या मध्यभागी असलेल्या अमायझंजन कालव्यात शनिवारी सकाळी एक कामगार बेपत्ता झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला तेव्हा जॉय नावाचा तात्पुरता कंत्राटी कर्मचारी इतर दोघांसह कालव्याच्या थांपनूर भागाची सफाई करत होता. पाण्याचा प्रवाह वाढल्यावर आम्ही कालव्यातून बाहेर आलो, पण जॉयला ते जमले नाही, असे सहकाऱ्यांनी सांगितले.
कालवा प्लास्टिक आणि घनकचऱ्याने भरला आहे, त्यामुळे बचावकार्य कठीण झाले आहे. प्लास्टिक कचरा काढण्यासाठी कामगार कालव्यात उतरले होते.
तिरुवनंतपुरमच्या अमायझंजन कालव्यात एक स्वच्छता कर्मचारी बेपत्ता
बचावकार्य सुरूच
रेल्वे स्थानकाच्या आतील रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या 200 मीटर लांबीच्या कालव्याच्या बोगद्यात वाहून गेलेल्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि स्कूबा डायव्हिंग टीम शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आता आम्हाला प्लास्टिक आणि कचरा साफ करावा लागेल, अन्यथा आम्ही बोगद्यात पुढे जाऊ शकणार नाही. पाच तासानंतरही बचावकार्य सुरूच आहे.