आसाममध्ये 'आप'ची सत्ता आल्यास मोफत वीज, सर्व बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे केजरीवालांचे आश्वासन

अरविंद केजरीवाल यांनी आसाममध्ये आपला पक्ष सत्तेवर आल्यास मोफत वीज आणि नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, असे विधान राज्यातील एका रॅलीला संबोधित करताना केले.

(Photo Credit - Arvind Kejriwal)

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आसाममध्ये आपला पक्ष सत्तेवर आल्यास मोफत वीज आणि नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, असे विधान राज्यातील एका रॅलीला संबोधित करताना केले.भारतीय जनता पक्ष ईशान्येकडील राज्यात “घाणेरडे राजकारण” खेळण्याशिवाय काहीही करत नसल्याचा आरोप करत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आसाममधील सर्व बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले.

“आप 2015 मध्ये दिल्लीत आणि 2016 मध्ये भाजप सत्तेवर आले. आज आपण दिल्लीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. हिमंता बाबू (आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा) यांनी सात वर्षांत राज्यासाठी काय केले? काहीही नाही, फक्त गलिच्छ राजकारण,” असा आरोप देखील अरविंद केजरीवाल यांनी केला.केजरीवाल यांनी असेही सांगितले की आप ने सात वर्षात दिल्लीत 12 लाख लोकांना आणि पंजाबमध्ये एका वर्षात 28,000 लोकांना रोजगार दिला आहे. आसाममध्येही पक्षाने सरकार स्थापन केल्यास तेच करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आसाममध्ये पक्षाचे सरकार स्थापन केल्यानंतर एका वर्षाच्या आत गुवाहाटीतील सर्व घरांना पाईपद्वारे पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे.

या रॅलीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मानही उपस्थित होते. भगवंत सिंग मान म्हणाले की, देशाला विकासासाठी नवीन इंजिनची गरज आहे. भाजप विकासाच्या दुहेरी इंजिनबद्दल बोलतात. पण, त्याची गरज नाही. गरज आहे ते ‘नवीन इंजिन’, जे वेगाने धावते आणि महत्त्वाचे म्हणजे ट्रॅकवर राहते,” असे भगवंत सिंग मान यांनी रॅलीत म्हटले.