Murder for Refusing Sex: सेक्सला नकार, 45 वर्षीय प्रियकराकडून 65 वर्षीय महिलेची हत्या; Kaushambi Murder Case चर्चेत

Sexual Assault Refusal Murder: उत्तर प्रदेशातील कौशाम्बी येथे एका 45 वर्षीय पुरूषाला एका वृद्ध महिलेने शारीरिक संबंध नाकारल्यानंतर तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पीडिता, तिच्या पतीपासून अनेक वर्षे विभक्त आणि एकटी राहात होती.

Murder प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील कौशाम्बी (Kaushambi Murder) जिल्ह्यात एका 60 वर्षीय महिलेची हत्या (Elderly Woman Murder) केल्याच्या आरोपाखाली 45 वर्षीय पुरूषाला अटक करण्यात आली आहे. सावरी देवी असे या महिलेचे नाव आहे. सदर महिला 25 मे रोजी तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी सांगितले की, तिचा गळा कापडाने बांधलेला होता आणि तिचे कपडे विस्कटलेले दिसत होते. शारीरिक संबंधास नकार (Murder for Refusing Sex) दिल्याने प्रियकराने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

प्रेमसंबंधातून हिंसाचार

पोलीस तपासात पुढे आलेल्या तपशीलानुसार, आरोपी दिनेश कुमार सेन आणि सावरी देवी यांच्यात प्रेमसंबंध होते. सावरी देवी यांना मूल नव्हते आणि त्यांच्या विवाहानंतर केवळ 6-7 वर्षांत त्यांना पतीने टाकले होते. त्या सासरच्या जागेवर एका मातीच्या घरात एकट्या राहत होत्या. दूध व आवश्यक वस्तू पुरवणाऱ्या दिनेशसोबत त्यांचे हळूहळू जवळचे संबंध विकसित झाले. पुढे ते प्रेमसंबंधात बदलले. (हेही वाचा, NMMT Bus Sex Viral Video: एनएमएमटी बसमध्ये सेक्स; कामोठे पोलिसांकडून चौकशी; पश्चाताप झालेल्या जोडप्यास दंड)

शारीरिक संबंध नाकारल्याने खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. तो सावरी देवी यांच्याशी रात्री फोनवर बोलायचा आणि वेळोवेळी त्यांच्या घरी यायचा. घटना घडली त्या दिवशी म्हणजेच 23 मे रोजी रात्री 10 च्या सुमारास फोनवर बोलल्यानंतर तो त्यांच्या घरी गेला आणि शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र, सावरी देवी यांनी तब्येतीच्या कारणास्तव नकार दिला. दिनेशला वाटले की, त्या कारण सांगत आहेत आणि त्यांनी जबरदस्तीचा प्रयत्न केला. जेव्हा सावरी देवी यांनी त्याला दूर लोटले, तेव्हा संतप्त होऊन त्याने कापडाने गळा घालून त्यांचा खून केला. (हेही वाचा, Mumbai Shocker: सेक्ससाठी नकार दिल्याने 18 वर्षीय तरुणीला बेदम मारहाण, कवटी फोडली; 26 वर्षीय कास्टिंग डायरेक्टरला मुंबई पोलिसांकडून अटक)

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न निष्फळ

गुन्ह्यानंतर अटक होण्याच्या भीतीने दिनेशने सावरी देवी यांचा मोबाईल फोन घेऊन त्याच्या घराजवळील नाल्यात फेकून दिला. मात्र, चौकशीत त्याच्या कबुलीच्या आधारे पोलिसांनी फोन जप्त केला आहे. मंगळवारी बसुहर वळणाजवळून दिनेशला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले व न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी आरोपीला अटक झाल्याचे पुष्टी करत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. या गंभीर प्रकरणात न्याय मिळावा म्हणून सखोल तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement