Lokendra Singh Kalvi Passes Away: श्री राजपूत करणी सेना संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे Cardiac Arrest मुळे निधन

श्री राजपूत करणी सेना (Karni Sena) संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी (Lokendra Singh Kalvi Passes Away) यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने पाठिमागील काही दिवसांपासून लोकेंद्र सिंह कालवी (Lokendra Singh Kalvi) हे प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांच्यावर जयपूर (Jaipur) येथील एसएमएस रुग्णालयात (SMS Hospital) उपचार सुरु होते.

Lokendra Singh Kalvi (Photo Credit: ANI)

श्री राजपूत करणी सेना (Karni Sena) संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी (Lokendra Singh Kalvi Passes Away) यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने पाठिमागील काही दिवसांपासून लोकेंद्र सिंह कालवी (Lokendra Singh Kalvi) हे प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांच्यावर जयपूर (Jaipur) येथील एसएमएस रुग्णालयात (SMS Hospital) उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच कार्डियक अरेस्‍ट (Cardiac Arrest) आल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिले आहे. सवाई मान सिंह (एसएमएस) रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अचल शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, जून 2022 पासून त्यांच्यावर एसएमस रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, सोमावारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लोकेंद्र सिंह कालवी यांच्यावर नागौर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आज अंत्यसंस्कार केले जातील. लोकेंद्र सिंह कलवी हे अनेक प्रकरणांमुळे प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरत असत. खास करुन राजपूत समाजाच्या अस्मितांवरुन ते नेहमीच सजग असत. समाजाविषयी, प्रसारमाध्यमं, चित्रपट, साहित्य यांमधून राजपूत समाजाविषयी बोलले जाते याबद्दल ते नेहमी दक्ष असत. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे अनेक वादही निर्माण होत असत. (हेही वाचा, Bigg Boss 13 Protest: बिग बॉस 13 च्या 'Bed Friends Forever'या कन्सेप्टला करणी सेनेचा विरोध, सलमान खानच्या घराबाहेर घोषणाबाजी करणा-या 20 जणांना अटक)

लोकेंद्र सिंह कालवी यांनी नागौर येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सन 1998 मध्ये भाजप उमेदवार म्हणून बाडमोर येथून निवडणूक लढवली होती. त्यावेळीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सन 2023 मध्ये काही लोकांसोबत त्यांनी एक समाजिक आघाडी केली आणि आरक्षणासंदर्भात एक मोहीम सुरु केली.

ट्विट

लोकेंद्र सिंह कालवी यांना राजकीय वारसा घरातून मिळाला होता. लोकेंद्र सिंह कालवी हे माजी केंद्रीय मंत्री कल्याण सिंह कालवी यांचे चिरंजीव होते. कल्याण सिंह करालवी हे चंद्रशेखर यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जात. त्यांनी व्हीपी सिंह सरकार कोसळल्यानंतर चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी 1991 मध्ये केंद्रीय कॅबीनेटमध्ये उर्जा मंत्री होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now