Karnataka: अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, पाच जणांवर POCSO Act अन्वये गुन्हा दाखल
पीडितेच्या मामाचा मुलगा जयप्रकाश याने पहिल्यांदा पीडितेवर 2019 मध्ये बलात्कार केला. त्यानंतर त्याने ही घटना आपल्या मित्रांना सांगितली. मग मित्रांनीही पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत वारंवार बलात्कार केला.
अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पाच जणांवर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (POCSO Act) आणि एससी आणि एसटी (अत्याचार प्रतिबंधक) सुधारणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात ही घटना घडली. अक्षय देवाडिगा, राजा, सुकुमार बेलचडा,कमलाक्षा बेलचडा आणि जयप्रकाश अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांची वये अनुक्रमे 24,28,30 अशी आहेत. पाचही जणांनी पीडितेवर वेगवेगळ्या वेळी बलात्कार केला. पीडितेच्या मामाचा मुलगा जयप्रकाश याने पहिल्यांदा पीडितेवर 2019 मध्ये बलात्कार केला. त्यानंतर त्याने ही घटना आपल्या मित्रांना सांगितली. मग मित्रांनीही पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत वारंवार बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपी राजा याने पीडितेवर मे 2023 मध्ये बलात्कार केला. त्यानंतर त्याचा मित्र अक्षय आणि सुकुमार या दोघांनी वेगवेगळ्या वेळी पीडितेवर जून 2023 मध्ये बलात्कार केला. आरोपी सुकुमारने अल्पवयीन मुलीला लग्नाच्या बहाण्याने बेरापाडवू गावात येण्यास सांगितले आणि नंतर तिथे तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनुसार, 28 जुलै रोजी कमलाक्षाने तिच्यावर शेवटचा बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने तिने तिला कोजाप्पाडी गावात बोलावले आणि तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. पीडितेने याप्रकरणी विटाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली. (हेही वाचा, Nagpur Minor Rape: अल्पवयीन दोन मुलींचा लैंगिक छळ, आजोबा आणि मित्राचे कृत्य; नागपूर येथील घटना)
POCSO कायदा म्हणजे लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा. मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकरणांना संबोधित करण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी 2012 मध्ये भारत सरकारने लागू केलेला हा एक महत्त्वाचा कायदा आहे. POCSO कायदा हा भारतातील मुलांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे रक्षण करण्यासाठी आणि देशातील बाल लैंगिक अत्याचाराच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक आवश्यक कायदा आहे. मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.