IPL Auction 2025 Live

Mangaluru Hostel: आईचा वाढदिवस साजरा करण्याची नाही मिळाली परवानगी; 14 वर्षीय मुलाची आत्महत्या

वसतिगृह प्रशासनाने या मुलास त्याच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे नाराज झालेल्या या मुलाने टोकाचे पाऊल उचलले. ही घटना कर्नाटक (Karnataka) जिल्ह्यातील मंगळुरु जिल्ह्यातील वसतिगृहात (Mangaluru Hostel) घडली.

Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

वसतीगृहात (Hostel) राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. वसतिगृह प्रशासनाने या मुलास त्याच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे नाराज झालेल्या या मुलाने टोकाचे पाऊल उचलले. ही घटना कर्नाटक (Karnataka) जिल्ह्यातील मंगळुरु जिल्ह्यातील वसतिगृहात (Mangaluru Hostel) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले की, वसतिगृहातील एका मुलाने आत्महत्या केली होती. आम्हाला मिळालेली कथीत माहिती अशी की, संबंधित मुलाने आपल्या आईचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्याला प्रशासनाकडून परवानगी मिळाली नाही. प्राप्त माहितीच्या आधारे आम्ही चौकशी करत आहोत.

पोलिसांनी माहिती देताना पुढे सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी या मुलाने आपल्या वसतिगृहाच्या वॉर्डनला मोबाईलवरुन आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची इच्छा 11 जून रोजी व्यक्त केलीहोती. मात्र, वॉर्डनने त्याला फोन करण्यास मनाई केल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Alibag Suicide Case: पती-पत्नीने आधी मुलांना दिले विष, नंतर स्वत: केली आत्महत्या)

अधिक माहिती देताना पोलिसांनी म्हटले की, अल्पवयीन मुलाने आपल्या आईच्या वाढदिवसा निमित्त फोन करण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली. परवानगी न मिळाल्याने तो आईला शुभेच्छा देऊ शकला नाही. यामुळे मुलगा मनातून दु:खी झाला. खिन्न मनाने त्याने एक सुसाईड नोट (Suicide Note) लिहीली. त्यानंतर त्याने गळफास घेतला. पोलिसांनी म्हटले की, शनिवारी (11 जून) या मुलाने हे जीवघेणे पाऊल उचलले. एका मुलाचा मृतदेह छताला लटकवलेल्या आवस्थेत आढळून आल्याने प्रशासन हादरुन गेले. तातडीने पोलिस आणि मुलाच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.