Karnataka Assembly Bypolls 2019: येदियुरप्पा सरकारची परीक्षा; भाजपची प्रतिष्ठा पणाला; 15 पैकी 8 जागा तर जिंकाव्याच लागणार
कर्नाटक विधानसभेसाठी 15 जागांसाठी पोटनिवडणूक उद्या (गुरुवार, 5 डिसेंबर 2019) पार पडत आहे. अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडी घडल्यानंतर कर्नाटक विधानसभा पोटनिवडणू 2019 पार पडत आहे. या निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 9 डिसेंबर 2019 रोजी पार पडत आहे.
Karnataka Assembly Bypolls 2019: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा (BS Yediyurappa) सरकार उद्या परीक्षेला सामोरे जात आहे. तर, या परीक्षेचा निकाल सकारात्मकच नव्हे तर दणदणीत यावा यासाठी भाजप (BJP) नेतृत्वाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी 15 जागांसाठी पोटनिवडणूक उद्या (गुरुवार, 5 डिसेंबर 2019) पार पडत आहे. अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडी घडल्यानंतर कर्नाटक विधानसभा पोटनिवडणू 2019 पार पडत आहे. या निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 9 डिसेंबर 2019 रोजी पार पडत आहे. या निकालावरच चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या येदियुरप्पा प्रणीत भाजप सरकारचे भवितव्य समजणार आहे. त्यामुळे या निवडणुकीवर भाजप, काँग्रेस (Congress), जनता दल सेक्युलर ( JD(S)) यांच्यासह कर्नाटक राज्यातील इतरही राजकीय पक्षांचे बारीक लक्ष असणार आहे.कोणकोणत्या मतदारसंघात आहे पोटनिवडणूक?
कर्नाटक विधानसभेसाठी 15 ठिकाणी पोटनिवडणूक पार पडत आहे. पोटनिवडणूक पार पडत असलेले विधानसभा मतदारसंघ पुढीलेप्रमाणे - अठानी, कगवाड, गोकक, येलापुर, हिरेकेरूर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबेलापुर, के.आर. पुरा, यशवंतपुरा, महालक्ष्मी लेआऊट, शिवाजीनगर, होसाकोटे, के.आर. पेटे, हुनसूर या मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. तर, मुसकी (राइचुर जिल्हा) आणि आर.आर. नगर (बंगळुरु) येथील पोटनिवडणुकीवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विधानसभा निवडणूक मे 2018 मध्ये आलेल्या मतमोजणी निकालावर दाखल असलेल्या खटल्यामुळे न्यायालयाने या ठिकाणी निवडणुकीवर स्थिगिती दिली आहे.
भाजपला किमान 8 जागातरी जिंकाव्याच लागतील
सर्वात मोठा पक्ष ठरुनही महाराष्ट्रात भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रानंतर भाजपसमोर कर्नाटकचे आव्हान आहे. हे आव्हान पेलत सत्ता टिकवायची तर 15 जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजप किमान 8 जागा तरी जिंकाव्याच लागणार आहेत. अन्यथा सध्या राज्यात सत्तेवर असलेले येदियुरप्पा सरकार आणखी अल्पमतात येऊन ते कोसळण्याचे संकट भाजपवर कोसळणार आहे. (हेही वाचा, कर्नाटक पोटनिवडणूक निकाल: भाजपला धक्का, काँग्रेस, जेडीएस बहुमताने विजयी; २०१९साठी कमळ धोक्यात, हात 'अच्छे दिन'च्या तयारीत)
दरम्यान, एनकेन प्रकारेन सत्ता मिळवायचीच या जिद्दीने भापने मोठ्या चातूर्याने उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी भाजपने सर्वाधिक बंडखोरांना आश्रय दिला आहे. हे बंडखोर हे काँग्रेस-जेडीएस सोडून भाजपच्या वळचणीला आले आहेत. भाजपने याच बंडखोरांवर डाव लावत उमेदवारी दिली आहे. मात्र, अडचण अशी की, हे उमेदवार त्यांच्या आगोदरच्या (काँग्रेस-जेडीएस) कार्यकर्ते आणि समर्थकांच्या नजरेत विश्वासघातकी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या उमेदवारांच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी काम करण्यास नकार दिला तर, या सर्व उमेदवारांची भिस्त केवळ भाजप कार्यकर्त्यांवरच असणार आहे. त्यामुळे कर्नाटकात सामना मोठा रंजक असणार आहे हे नक्की.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)