Lockdown मध्ये दारू मिळत नाही म्हणून प्यायला सॅनिटायझर आणि कफ सिरप; मद्यपी तरुणाचा मृत्यू
र्नाटक (Karnatak) मधील धारवाड (Dharwad) येथे एका 29 वर्षीय तरुणाने दारू (Alcohol) मिळत नाही म्हणून वेगळा पर्याय तयार करत असताना सॅनिटायझर (Sanitizer) आणि कफ सिरप (Cough Syrup) एकत्र करून प्यायल्याने त्याचा जीव गेल्याचे समजत आहे.
लॉक डाऊन (Lockdown) काळात अनेकांची राहण्याची, खाण्याची गैरसोय होत आहे मात्र अशावेळी काही मंडळी मात्र सर्व सोयी असतानाही भलत्याच नादात आपला जीव धोक्यात घालत आहेत. अर्थात हा नाद म्हणजे दारू! कर्नाटक (Karnatak) मधील धारवाड (Dharwad) येथे एका 29 वर्षीय तरुणाने दारू (Alcohol) मिळत नाही म्हणून वेगळा पर्याय तयार करत असताना आपला जीव गमावला आहे. या मद्यपी तरुणाने दारूच्या ऐवजी सॅनिटायझर (Sanitizer) आणि कफ सिरप (Cough Syrup) एकत्र करून प्यायल्याने त्याचा जीव गेल्याचे समजत आहे. सुदीप करीयांना (Sudeep Kariyana) असे या तरुणाचे नाव असून तो अवघा 29 वर्षाचा होता . कर्नाटक युनिव्हर्सिटीच्या जीवशास्त्र (Zoology) विभागात सुदीप शिक्षण घेत होता. त्याला दारूचे व्यसन होते, मात्र मागील काही काळात दारू मिळत नसल्याने तो सतत निराश असायचा.(हेही वाचा - वाईन, लिकरसाठी ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल: या सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींना बळी पडू नका; पोलिसांचे नागरिकांना आवाहन)
पोलिसांच्या माहितीनुसार, सुदीपचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली. सुदीप ज्याठिकाणी राहत होता त्या घरातून अचानक विचित्र कुजलेले वास येत होते त्यामुळे त्या घराच्या मालकाला शेजाऱ्यांनी बोलावून घेतले या मालकाने दार उघडले असता आत मृतदेह आढळून आला. त्याच्या शवच्या शेजारीच सॅनिटायझर आणि कफ सिरपची रिकामी बॉटल होती. यावर आधारित प्राथमिक तपासानुसार, सुदीपणे सॅनिटायझर आणि कफ सिरप एकत्र करून प्यायल्याने हा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. MHA Clarifies on Midnight Order: दारु, सिगरेट, तंबाखूच्या विक्रीवर निर्बंध कायम!
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.तसेच सुदीपचे मृत शरीर हे तपासासाठी पोस्ट मॉर्टमला पाठवण्यात आलेय. याबाबत रिपोर्ट येताच या घटनेचा उलगडा होईल. यापूर्वी सुद्धा अनेकदा लोकांनी दारू न मिळाल्याच्या नैराश्यातु न आत्महत्या केल्या आहेत याच पार्श्वभूमीवर सरकारने दारूची दुकाने सुरु करावीत अशी मागणी सुद्धा केली जात आहे.