Karnakata Apple iPhone Plant Violence: Wistron कडून भारतामधील Vice-President ची हाकालपट्टी, कर्मचार्यांची मागितली माफी
त्यांची करेक्टिव्ह अॅक्शन पूर्ण झाल्यानंतरच पुढील व्यवसाय सुरू होईल असं म्हटलं आहे.
Wistron Corporation च्या कर्नाटक मधील प्लांटमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल आज (19 डिसेंबर) परिपत्रक जारी करत आपली भूमिका स्पष्ट करताना कंपनीच्या वाईस प्रेसिडंटवरील व्यक्तीला काढून टाकल्याची माहिती दिली आहे. तर सर्व कर्मचार्यांची माफी मागितली आहे. दरम्यान घडल्या प्रकाराबद्दल independent auditors ची नेमणूक केली असल्याचं म्हटलं आहे. ते सार्या प्रकारावर लक्ष ठेवतील. सोबतच आमचं लक्ष्य आहे की कर्मचार्यांना सन्मानाने वागवलं जाईल. सोबतच त्यांना मोबदला दिला जाईल असं अॅपल कडून सांगितलं आहे.
आयफोन मॅन्युफ्रॅक्चर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये व्यवहार पाहणार्या वाईस प्रेसिडंटला आम्ही काढून टाकत आहोत. तर कंपनीमध्ये टीम्समध्ये काही बदल केले जातील. ज्याच्या द्वारा असा प्रकार पुन्हा घडणार नाही. तर अॅपलने दिलेल्या माहितीनुसार Wistron ला प्रोबेशनवर टाकण्यात आले असून त्यांना नवा व्यवसाय तात्पुरता थांबवण्यात आला आहे. त्यांची करेटिव्ह अॅक्शन पूर्ण झाल्यानंतरच पुढील व्यवसाय सुरू होईल असं म्हटलं आहे.
ANI Tweet
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना 52 कोटींचं नुकसान झालं आहे. दिलासादायक बाब ही आहे की या तोडफोडीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग यंत्रांमध्ये कोणताही फटका बसलेला नाही तसेच वेअरहाऊसमध्ये नुकसान झालेले नाही.
कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यात नरसापूर औद्योगिक क्षेत्र आहे. येथे तायवान कंपनी अॅपल आयफोनची निर्मिती करते. या कंपनीच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी पगार थकवल्याच्या रागातून 12 डिसेंबरला तोडफोड केली होती.