ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई माधवी राजे सिंधिया यांना कोरोनाची लागण, दिल्लीच्या Max Hospital मध्ये उपचार सुरु- रिपोर्ट्स
दोघांनाही दिल्ली येथील मॅक्स हॉस्पिटल (Max Hospital) येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
भारतीय जनता पक्षात (BJP) नव्याने सामील झालेले युवा नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) आणि त्यांची आई माधवी राजे सिंधिया (Madhavi Raje Scindia) यांना नुकतेच कोरोना व्हायरस (Coronavirus) चे निदान झाले आहे. दोघांनाही दिल्ली येथील मॅक्स हॉस्पिटल (Max Hospital) येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वास्तविक ज्योतीरादित्य यांना घशात खवखव आणि ताप अशी लक्षणे दिसून आल्यावर चार दिवसांपूर्वीच हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. तर त्यांच्या आईला सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. मात्र तरीही खबरदारीचा पर्याय म्हणून दोघांचीही चाचणी करण्यात आली होती. आज याबाबत IANS तर्फे माहिती देण्यात आली. त्यांच्या दोघांचेही रिपोर्ट्स कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे माध्यमातील सूत्रांकडून समजत आहे.
प्राप्त माहितीनुसार, ज्योतिरादित्य सिंधिया लॉक डाऊन सुरु झाल्यापासून ज्योतिराधिती हे आपल्या कुटुंबाच्या समवेत दिल्ली मध्येच वास्तव्यात होते. त्यांना कोरोनाची लागण नेमकी कोणाच्या माध्यमातून झाली याचा सध्या टापा स्केल जात आहे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आता विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Coronavirus In India: देशातील कोणत्या राज्यात किती कोरोनाबाधित? पहा महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात सह सर्व राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
पहा ट्विट
दरम्यान, सध्या दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 29,943 जण कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 11,357 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 17,712 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील ताप आणि खोकला या लक्षणांमुळे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर आज त्यांचीदेखील कोव्हिड टेस्ट घेण्यात आली आहे.