First Woman CJI: न्यायाधीश B.V.Nagarathna भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याची शक्यता; घ्या जाणून

बुधवारी (18 ऑगस्ट) ही माहिती पुढे आली. न्यायाधीश बीव्ही नागारत्ना या कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. नागारत्ना या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ईएस वेंकटरमैया यांच्या कन्या आहेत.

Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

न्यायाधीश बीव्ही नागरत्ना (Justice B.V.Nagarathna) या भारताच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश (First Woman CJI) ठरण्याची शक्यता आहे. बुधवारी (18 ऑगस्ट) ही माहिती पुढे आली. न्यायाधीश बीव्ही नागारत्ना या कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. नागारत्ना या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ईएस वेंकटरमैया यांच्या कन्या आहेत. न्यायाधीश नागरत्ना या सध्या कर्नाटक कमर्शियल आणि संवैधानिक कायद्यांची व्याख्या करत अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. त्यांचे वडील ई एस व्यंकटरमय्या हे 19 जून 1989 ते डिसेंबर 1989 या कालावधीत देशाचे मुख्य न्यायाधीश राहिले आहेत.

न्यायाधीश बीव्ही नागरत्ना यांनी कर्नाटकमध्ये 1987 मध्ये बार काऊन्सीलमध्ये नोंद करत संवैधानिक आणि आर्थिक कायद्यांविषयी प्रॅक्टीस सुकु केली होती. त्यांनी 2008 मध्ये कर्नटक उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश बनविण्यात आले. पुढे 17 फेब्रुवारी 2010 मध्ये न्यायाधीश नागरत्ना स्थायी स्वरुपात हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्या. (हेही वाचा, Supreme Court: राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय आमदार, खासदारांवरील गुन्हे मागे घेता येणार नाहीत- सर्वोच्च न्यायालय)

मुख्य न्यायाधीश एन व्ही रमना यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुख्य न्यायालयात पदोन्नतीसाठी 9 न्यायाधिशांच्या नावाची शिफारस केली आहे. न्यायाधीश बीव्ही नागरत्न यांच्या नावाचीही कॉलेजियमने शिफारस केली आहे. या शिफारशीच्या यादीत हिमा कोही आणि न्यायाधीश बेरा त्रिवेदी यांच्यासह इतर दोन महिला न्यायाधीशांचाही समावेश आहे. भारतात महिला सरन्यायाधीशांच्या नावाची मागणी प्रदीर्घ काळापासून होत आहे.

आपल्या सेवानिवृत्तीपूर्वी भारताचे मुख्य न्यायाधीश एसए बोबडे यांनी म्हटले होते की, भारतासाठी एक महिला मुख्य न्यायाधीश होण्याची वेळ आली आहे. त्यांनी एप्रिलमध्ये म्हटले होते की, आमच्या मनात महिलांचे हीत सन्मान सर्वतोपरी आहे. जो आम्ही चांगल्या पद्धतीने व्यक्त करु शकतो. आमच्या मनात कोणताही किंतू परंतू नाही. फक्त आम्हाला एक चांगला उमेदवार मिळायला हवा इतकेच.