Journalist Vikram Joshi Dies: रामराज्य सांगून गुंडाराज दिलं; पत्रकार विक्रम जोशी यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांचे संतप्त ट्विट
पत्रकार विक्रम जोशी (Journalist Vikram Joshi) यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारने राम राज्याचे वचन देऊन राज्यात गुंडाराज निर्माण केले आहे अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
Journalist Vikram Joshi Dies: पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर गाझियाबाद (Ghaziabad) मध्ये सोमवार (20 जुलै) दिवशी गोळीबार व मारहाण झाली होती. आज सकाळी त्यांचे उपचारांच्या दरम्यान निधन झाले आहे. आपल्या भाचीची छेडछाड करणार्या तरूणांना विरोध केल्याने त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता. या एकूण प्रकरणानंतर आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर ताशेरे ओढत एक संतप्त ट्विट केले आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारने राम राज्याचे वचन देऊन राज्यात गुंडाराज निर्माण केले आहे. स्वतःच्या भाचीच्या सुरक्षेची मागणी केलेल्या विक्रम जोशी यांच्यावरील हल्ला हा निंदनीय आहे त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती आणि न्याय मिळावा अशी मी प्रार्थना करतो अशा आशयाचे राहुल गांधी यांचे ट्विट आहे.
पत्रकार विक्रम जोशी यांच्या पुतण्याने ANI शी संवाद साधताना, कमल-उद- दिन यांच्या मुलाने हल्ला केल्याचा दावा केला आहे. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तो पर्यंत विक्रम यांचे शव ताब्यात घेणार नाही असेही त्याने सांगितले आहे. अभिषेक व रवी अशा नावाच्या दोन मुलांनी काही गुंडासोबत मिळून विक्रम यांच्यावर रॉड ने हल्ला केला. गोळीबार केला, जबर मारहाण केली. यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. आज त्यांचे निधन झाले आहे.
राहुल गांधी ट्विट
ANI ट्विट
विक्रम यांच्या भाचीने 16 जुलै दिवशी काही तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात छेडछाड केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसात तक्रार दाखल केल्याच्या रागातून त्या अज्ञात तरुणांनी बदल्याच्या भावनेतून पत्रकार विक्रम जोशी यांना बेदम मारहाण करून गोळीबार केला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे. त्याचा अधिक तपास सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात ९ जणांना अटक करण्यात आली आहे.