Jobs In India: 2023 मध्ये नोकऱ्यांमध्ये 6 टक्क्यांची घट, अहवालातून माहिती समोर, पाहा 2024 मध्ये कशी असेल स्थिती?

Naukri.com च्या माहितीनुसार, नवीन वर्षात आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये घट होऊ शकते, तर विमान वाहतूक, दूरसंचार, लॉजिस्टिक, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते.

(Photo credit: archived, edited, representative image)

ऑनलाइन जॉब (Online Jobs) प्लॅटफॉर्म Naukri.com ने देशातील व्हाईट कॉलर नोकऱ्यांबाबतचा डेटा गोळा केला आहे. त्यानुसार, 2023 मध्ये भारतात व्हाईट कॉलर (White Coller Jobs) नोकऱ्यांमध्ये 6 टक्क्यांची घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयटी, रिटेल, बीपीओ, शिक्षण, एफएमसीजी, आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रात नोकऱ्या कमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. व्हाईट कॉलर नोकऱ्यांची संख्या घटली आहे. यामध्ये जागतिक अनिश्चितता असूनही पायाभूत सुविधा, तेल आणि वायू, रिअल इस्टेट, वीज, प्रवास इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे.  (हेही वाचा - Stressful Jobs and Low Salary: तणावपूर्ण नोकऱ्या आणि कमी वेतन असलेल्या पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढतो- Research)

पुढील वर्षी व्हाईट कॉलर नोकऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. परंतू, कंपन्या अत्यंत सावधगिरीनेच नवीन भरती करतील. यासह, कमी भरती, चांगली व्यवसाय वाढ आणि जीडीपीच्या आकडेवारीमुळे कौशल्याची कमतरता 2023 मध्ये देशात व्हाईट कॉलर नोकर्‍यांच्या संख्येत वाढ होईल. BFSI आणि FMCG कंपन्यांमध्ये नियुक्ती प्रक्रियेत अधिक सावधगिरी बाळगली जाईल असे देखील या अहवालात म्हटले आहे.

Naukri.com च्या माहितीनुसार, नवीन वर्षात आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये घट होऊ शकते, तर विमान वाहतूक, दूरसंचार, लॉजिस्टिक, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. दिल्ली/एनसीआर, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे नवीन भरतीमध्ये घट दिसून आली आहे, तर अहमदाबाद, वडोदरा आणि जयपूरमध्ये नोकऱ्यांची संख्या वाढली आहे.