JNU Attack: जेएनयू हल्ला प्रकरणातील हल्लेखोरांची ओळख पटली; सरकारी सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांचा दावा

या तक्रारी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी म्हटले आहे की, रविवारी जेएनयूमध्ये घडलेल्या घटनेनंतर जेएनयू परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Masked men entered JNU and thrashed students (Photo Credits: Twitter/Screengrab)

जेएनयू (JNU) मध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या हल्लेखोरांविरोधात सुमारे 11 तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. यातील तक्रारींपैकी एक तक्रार प्रोफेसरांकडून करण्यात आली आहे. 3 अभाविपकडून करण्यात आली आहे. तर 7 तक्रारी जेएनयूएसयू व इतर स्टूडेंट्स संघटनांकडून करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी या सर्व तक्रारी गुन्हे शाखेकडे वर्ग केल्या आहेत. या तोडफोडीस तीन दिवस होऊनही अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आली नाही.

सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काही बुरखाधारी व्यक्तींची ओळख पटली आहे. हे लोक तोडफोड करताना व्हिडिओत दिसत आहेत. व्हिडिओत दिसणाऱ्या हल्लेखोरांची ओळख पोलीस पटवत आहेत. या हल्लोखोरांनी केलेल्या हल्ल्यात जेएनयूमधील इमारत आणि काही खासगी संपत्तीचे नुकसान झाले आहे. (हेही वाचा, JNU मध्ये हल्ला आम्ही केला! हिंदू रक्षक दलाचे कार्यकर्ता पिंकी चौधरी यांची कबुली (Watch Video))

एएनआय ट्विट

पोलिसांनी म्हटले आहे की, या प्रकरणात एकूण 11 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी म्हटले आहे की, रविवारी जेएनयूमध्ये घडलेल्या घटनेनंतर जेएनयू परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.