Jharkhand Lightning: झारखंडमध्ये हॉकीच्या सामन्या दरम्यान वीज कोसळली; 3 खेळाडूंचा मृत्यू, 5 जखमी

दुखापतग्रस्त खेळाडूंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, मृत पावलेल्या खेळाडूंचे शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. झारखंडच्या सिमडेगाला हॉकीची नर्सरी म्हटले जाते.

Jharkhand Lightning: झारखंडमध्ये हॉकीच्या सामन्या दरम्यान वीज कोसळली; 3 खेळाडूंचा मृत्यू, 5 जखमी
Lightning | Representational image (Photo Credits: pixabay)

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात बुधवारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 3 खेळाडूंना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर 5 खेळाडू गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनूसार हे खेळाडू हॉकी सामन्यसाठी सराव करत होते. मात्र वीज पडून त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कोळीबिरा येथील तुतिकेल पंचायतीच्या जपला आरसी शाळेच्या मैदानात खेळाडू हॉकीचा सामना खेळण्याच्या तयारीत होते. त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि विजांचा कडकडाट झाला. खेळाडू मैदानात उभे होते आणि सामना सुरु होणार होता. बाकीचे लोक पावसापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे गेले. (हेही वाचा -  India Weather Update: स्वातंत्र्या दिनाच्या दिवशी महाराष्ट्र, दिल्लीसह 27 राज्यात पावसाची शक्यता, राजधानीत यलो अलर्ट जारी )

दुखापतग्रस्त खेळाडूंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, मृत पावलेल्या खेळाडूंचे शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. झारखंडच्या सिमडेगाला हॉकीची नर्सरी म्हटले जाते. येथून अनेक राष्ट्रीय खेळाडू उदयास आले आहेत. यामध्ये सिल्व्हानस डुंगडुंग, ऑलिम्पियन विमल बॉय, सामुराई टेटे, सलीमा टेटे अशा अनेक मोठ्या हॉकीपटूंचा समावेश आहे

दरम्यान या घटनेनंतर परिसरात शोककला पसरली आहे. अनेकांनी या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केले आहे. झारखंडच्या हॉकी श्रेत्रात देखील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. दरम्यान उत्तर भारतात अद्यापही अनेक राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून लोकांना यामुळे मात्र मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2024 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).