Jet Airways Founder Naresh Goyal यांचा PMLA Court मध्ये जामिनीवरील सुनावणी दरम्यान 'जगण्याची आशा संपलीय...' म्हणत भावनांवरील बांध सुटला
त्याच्या निर्दोषतेवर विश्वास ठेवण्यासाठी ठोस कारणे आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
Canara Bank मध्ये 538 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात सध्या जेट एअरवेज चे (Jet Airways) चे संस्थापक नरेश गोएल (Naresh Goyal) यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टात काल या उद्योगपतीच्या भावनांचा बांध फुटला आणि त्याने हात जोडत कोर्टासमोर,' माझ्या जीवनाकडून आशा अपेक्षा संपल्या आहेत. जेल मध्येच मला मरण येऊ दे, जे जे रूग्णालयात मला नेऊ नका' असं म्हटल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावेळी त्यांना अश्रूदेखील अनावर झाले होते.
78 वर्षीय नरेश गोयल यांनी आपण पत्नी अनिता यांच्या आठवणींनी व्याकूळ होत असल्याचं म्हटलं आहे. 1 सप्टेंबर 2023 ला नरेश गोएल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर बॅंक फ्रॉडचे आरोप आहेत. सध्या त्यांना मुंबई मध्ये आर्थर रोड जेल मध्ये ठेवण्यात आले आहे. Special Judge M G Desphande यांच्यासमोर गोएल यांच्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी दरम्यान ही घटना घडली आहे. गोएल यांच्या पत्नींना कर्करोग आहे. तसेच त्यांची एकुलती एक लेक काळजी घेत आहे पण तिची देखील स्थिती ठीक नसते असं ते म्हणाले आहेत.
गोयल यांनी कोर्टासमोर त्यांना व्याधींमुळे होत असलेल्या विविध वेदना आणि त्रासाचा पाढा वाचताना म्हटलं की आपल्याला दरवेळी कोर्टात येणं देखील कठीण आहे. आता ही आपण कोर्टात आलो कारण सारी स्थिती मला स्वतः च्या तोंडाने सांगता यावी. यापुढे मला प्रत्येक वेळेस प्रत्यक्ष येता येणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.
गेल्या महिन्यात सादर केलेल्या जामीन अर्जात गोयल यांनी हृदयविकार, प्रोस्टेट समस्या आणि ऑर्थोपेडिक समस्या यासारख्या विविध आरोग्य समस्यांचा संदर्भ दिला. त्याच्या निर्दोषतेवर विश्वास ठेवण्यासाठी ठोस कारणे आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.