JEE Main Result 2021: जेईई मेन निकाल जाहीर, 100% गुण मिळवत 18 जणाना रँक 1 मध्ये, महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट याचाही समावेश

7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा (JEE Main Exam) दिली. त्यापैकी 44 उमेदवारांपैकी 100 पैकी 100% गुण मिळवत 18 उमेदवारांनी रँक क्रमांक 1 मिळवली आहे.

Exam (Photo Credits: Facebook)

नेशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन सेशन 4 2021 (JEE MAIN Result 2021 ) चा निकाल बुधवारी (15 सप्टेंबर) रात्री उशीरा जाहीर केला. 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा (JEE Main Exam) दिली. त्यापैकी 44 उमेदवारांपैकी 100 पैकी 100% गुण मिळवत 18 उमेदवारांनी रँक क्रमांक 1 मिळवली आहे. या 18 जणांमध्ये महाराष्ट्राच्या अथर्व अभिजीत तांबट ( Atharva Abhijeet Tambat) याचाही समावेश आहे. अथर्व हा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. ज्याचा या 18 जणांमध्ये समावेश झाला आहे. 18 जणांमध्ये आंध्रप्रदेश 4, राजस्थान-3, उत्तर प्रदेश, तेलंगणा प्रत्येकी 2 विद्यार्थी आहेत.

JEE Main परीक्षेत 1 रँक मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे आणि राज्य

(हेही वाचा, JEE Main Result 2021: जेईई मेन परीक्षा रिजल्ट जाहीर; जाणून घ्या कुठे, कसा पाहाल?)

JEE Main 2021 Result: असा पाहा

दरम्यान, एनटीएने 6 डिसेंबरल NTA चे संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर प्रोविजनल उत्तर आणि प्रश्न पत्रीका जाहीर केली होती. पाठिमागील 13 दिवसांपासून 7.32 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी जेईई मेन्स परिक्षेच्या निकालाची वाट पाहात होती. जेईईची अधिकृत वेबसाई jeemain.nta.nic.in याच्यासह जेईई मेन्स निकाल 2021 ntaresults.nic.in या संकेतस्थळावरही दिसणार आहे. जेईई मेन सत्र 4चा निकाल लिंक पर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थ्याला आपला आसन क्रमांक, जन्म तारिख आणि पासवर्ड आवश्यक असणार आहे.