Jaya Bachchan On Jagdeep Dhankar: 'सभापतींनी माफी मागावी, आम्ही शाळकरी मुले नाहीत'; राज्यसभेत जगदीप धनखर यांच्यावर भडकल्या जया बच्चन
राज्यसभेत घडलेल्या प्रकाराबाबत जया बच्चन यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षांकडून वापरले जात असलेले शब्द योग्य नसल्याचे जया बच्चन यांनी म्हटलं आहे.
Jaya Bachchan On Jagdeep Dhankar: आज राज्यसभेत (Rajya Sabha) समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) आणि सभापती जगदीप धनखर (Jagdeep Dhankar) यांच्यात जोरदार वादावादी झाली. जया बच्चन यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधत जगदीप धनखर यांच्या सभागृहात बोलण्याच्या पद्धतीवर आरोप केले. जया बच्चन यांनी जगदीप धनखर यांच्या शब्दावर आणि स्वरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यसभेत घडलेल्या प्रकाराबाबत जया बच्चन यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षांकडून वापरले जात असलेले शब्द योग्य नसल्याचे जया बच्चन यांनी म्हटलं आहे.
अध्यक्षांनी माफी मागावी - जया बच्चन
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर जया बच्चन म्हणाल्या की, अध्यक्षांकडून अनेकदा असे शब्द वापरले जातात, जे योग्य नाहीत. तुम्ही मेंदूहीन आहात. ट्रेझरी बेंचचे लोकही हे शब्द बोलतात. मी संसद सदस्य आहे. आजकाल राज्यसभेत जी भाषा वापरली जाते ती कधीच वापरली गेली नाही. अध्यक्षांनी माफी मागावी अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत ते (जगदीप धनखर) खुर्चीवर बसले आहेत, तोपर्यंत ठीक आहे, पण सभागृहाबाहेर तेही एका सामान्य खासदारासारखे आहेत. ते आमचे अन्नदाता नाहीत. मी सभापतींच्या टोनवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना त्यांनी माईक बंद केला. ते म्हणाले, 'तुम्ही सेलिब्रिटी असाल, पण मला पर्वा नाही.' (हेही वाचा - Jaya Bachchan And Jagdeep Dhankhar Over Amitabh: महिलांना पतीच्या नावानेच का ओळखले जावे? जया बच्चन यांचा जगदीप धनखड यांच्याबोत शाब्दिक खटका (Watch Video))
सभागृहात आज काय घडलं?
आज सभागृहात धनखर यांनी जया बच्चन यांना 'श्रीमती जया अमिताभ बच्चन' असे संबोधित केलं. यावरून पुन्हा वादाला सुरुवात झाली. दिग्गज अभिनेत्री उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, 'मी जया अमिताभ बच्चन बोलू इच्छिते की, मी एक कलाकार आहे, मला देहबोली आणि भाव समजतात. आणि सर, मला माफ करा, पण तुमचा टोन मला मान्य नाही. मान्य आहे तुम्ही खुर्चीवर बसलात, पण आपण सहकारी आहोत.' यावर धनखर म्हणाले, 'जया जी, तुम्ही खूप नाव कमावले आहे. पण तुम्हाला माहीत आहे की, अभिनेता हा दिग्दर्शकाच्या अधीन असतो. इथून मी जे पाहतो ते तुम्ही पाहिले नाही. दररोज, मला पुनरावृत्ती करायची नाही. मला शालेय शिक्षण नको आहे. मी एक व्यक्ती आहे जो मार्गाबाहेर गेलो आहे आणि तुम्ही म्हणाला, माझा टोन? पुरेसा आहे! तुम्ही कोणीही असू शकता, तुम्ही कदाचित सेलिब्रिटी असाल, पण तुम्हाला ऐकावं लागेल. मला ते सहन होणार नाही. इथे फक्त तुम्हीच नावलौकिक मिळवला असा आभास कधीही बाळगू नका. आम्हीही आमच्या प्रतिष्ठेने आलो आहोत आणि आम्ही त्या प्रतिष्ठेला अनुसरून राहतो.' (हेही वाचा, Amitabh- Jaya Bachchan Marriage: बिग बींनी अखेर सांगितले जया बच्चनशी लग्न करण्यामागचे खरे कारण)
पहा व्हिडिओ -
पहा व्हिडिओ -
काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही दिवसांपूर्वी उपसभापती हरिवंश यांनी सपा राज्यसभा खासदार जया बच्चन यांना राज्यसभेत बोलण्यासाठी आमंत्रित केले. तेव्हा त्यांनी त्यांचे नाव जया अमिताभ बच्चन असे म्हटले होते. याचा जया बच्चन यांना राग आला. तुम्ही फक्त जया बच्चन म्हंटले असते तर पुरे झाले असते, असे त्यांनी उपसभापतींना सांगितले होते. त्याचवेळी, या घटनेनंतर काही दिवसांनी जया बच्चन यांनी राज्यसभेत त्यांचे पूर्ण नाव (जया अमिताभ बच्चन) घेतले. त्यानंतर सभागृहात हशा पिकला. यावर उपाध्यक्ष जगदीप धनखरही जोरजोरात हसायला लागले. शुक्रवारी जगदीप धनखर यांना जया बच्चन यांचे पूर्ण नाव घेतले, ज्यावर त्या संतापल्या.