ठाणे: स्वामी भगवान नित्यानंद यांच्या मूर्तीच्या अपमानाबाबत दोन विश्वस्तांवर गुन्हा दाखल; 26 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आज देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभुमीवर दिल्लीतील राजपथावर जोरदार तयारी करण्यात आली असून सकाळी 10 वाजल्यापासून परेडला सुरुवात होणार आहे.

27 Jan, 04:56 (IST)

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथील, स्वामी भगवान नित्यानंद यांच्या मूर्तीच्या अपमानासंदर्भात रविवारी दोन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र शेणॉय आणि विश्वस्त श्रीपाद जोशी अशी आरोपींची नावे आहेत.

27 Jan, 04:06 (IST)

प्रजासत्ताक दिन शांततेत पार पडावा यासाठी खबरदारी म्हणून, काश्मीर खोऱ्यात बंद असलेली मोबाइल फोन सेवा आणि इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. काश्मीरमध्ये सायंकाळी चार वाजता मोबाइल टेलिफोन सेवा पूर्ववत करण्यात आली.

27 Jan, 03:02 (IST)

आज 71 व्या प्रजासत्ताक दिनी आसाम येथे चार बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. डिब्रूगढ मधील ग्राहम बाजारात NH-37 जवळ एका दुकानात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. तर सोनारी आणि पोलीस स्थानकाजवळही बॉम्बस्फोट झाले. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडंट (ULFA-I) ने आज या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे.

 

27 Jan, 02:27 (IST)

आरोग्य मंत्रालयाकडून 137 विमानांमधून, एकूण 29,707 प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आज 22 विमानांमधील 4,359 प्रवाशांची तपासणी झाली. अद्यापपर्यंत कोरोना वायरसचा एकही रुग्ण आढळला नाही.

27 Jan, 24:48 (IST)

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करणारे भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एएनआयचे ट्वीट-

 

26 Jan, 23:19 (IST)

 

नागरिकत्व दुरूस्ती कायदा संपूर्ण देशात लागू झाला असला तरीदेखील या कायद्याला अनेक राज्यातून विरोध दर्शवला जात आहे. यातच ठाणे शहरातील मुंब्रा परिसरातील नागरिकांनी नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात अंदोलन केले आहे. यात मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिलांचा समावेश आहे, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे. 

26 Jan, 22:04 (IST)

प्रजासत्ताक दिनानिमित्त वाघा बॉर्डरवर विशेष बिटींग द रिट्रीट सोहळ्याला सुरुवात झाली आहे. 

26 Jan, 21:09 (IST)

भारताची बॉक्सिंग पटू मेरी कॉम हिला पद्मविभुषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याबाबत मेरी कॉम हिने आनंंद व्यक्त केला आहे. 

 

26 Jan, 20:27 (IST)

पश्चिम बंगाल येथे 'भारत माता पूजा' दरम्यान पोलीस आणि भाजप तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रजासत्ताक दिनादिवशी वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

26 Jan, 20:03 (IST)

आसाम येथील बॉम्बस्फोट घडवून आणण्यापाठी ULFA यांचा हात असल्याचा संशय पोलीस महानिर्देशक भास्कर ज्योती यांनी व्यक्त केला आहे. (प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर आसाम येथे बॉम्बस्फोट)

26 Jan, 19:09 (IST)

प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा सुरु होण्यापूर्वी ग्रामसचिव आणि गावातील नागरिक यांच्यामध्ये काही कारणावरुन हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. 

26 Jan, 18:18 (IST)

लखनौ येथे प्रजासत्ताक दिनादिवशी CAA च्या विरोधात क्लॉक टॉवर येथे राष्ट्रध्वज हातात घेऊन आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

26 Jan, 17:53 (IST)

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण संपन्न झाला आहे.

26 Jan, 17:44 (IST)

राष्ट्रपती पदक पटकवणाऱ्या पोलीस, जीनव रक्षा, अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.

26 Jan, 17:32 (IST)

देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असून आज संविधान लागू केल्याचा दिवस आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून संविधानाचे वाचन केले आहे. 

26 Jan, 17:10 (IST)

मुंबईत उड्डाणपुलांचे भूमीपूज करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती दिसून आली आहे. 

26 Jan, 16:57 (IST)

राजपथावर वायूदलाकडून चित्तथरारक करामती करण्यात येत आहे. तर विमान आणि हेलिकॉप्टरच्या फ्लायपास्टला सुरुवात झाली आहे. 

26 Jan, 16:17 (IST)

राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी उपस्थिती लावली आहे. तसेच राजपथावर विविध राज्यांचे चित्ररथाचे प्रदर्शन करण्यात येत आहे.

26 Jan, 15:44 (IST)

जम्मू कश्मीर येथे भारताचा राष्ट्रध्वज फडवकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे.

Read more


आज देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभुमीवर दिल्लीतील राजपथावर जोरदार तयारी करण्यात आली असून सकाळी 10 वाजल्यापासून परेडला सुरुवात होणार आहे. या संचलनाच्या माध्यमातून देशाचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक कार्यक्रम राजपथावर पहायला मिळणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह यंदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मेसियास बोल्सोनारो हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तर पंढपूर मधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिराला राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे सजावट करण्यात आली आहे. या सजावटीमुळे अनेक भाविकांचे लक्ष वेधले जाणार आहे. तर विठ्ठलाच्या मुर्तीपाठी सुद्धा तिरंग्याच्या रंग वापरुन सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील धायरी मधील कलाकार आणि मोरया ग्रुपच्या वतीने विठ्ठल मंदिराची आजची सजावट करण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील राजपथ झळाळला तर मुंबईतील सीसीएमटी, बीएमसीवर इमारतींवर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. त्याचसोबतअरुण जेटली, सुष्मा स्वराज, जॉर्ज फर्नांनडिस, मनोहर पर्रिकरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार, सुरेश वाडकर, राहिबाई, पोपटरावांच्या रुपात मराठी कर्तुत्त्वाचा गौरव, सिनेस्टार आणि खेळाडूंचीही नावं जाहीर करण्यात आली आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement