Janmashtami 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून भारतवासियांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

जन्माष्टमीचं औचित्य साधून सणाचं औचित्य साधून ट्विटरच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवी उमंग घेऊन येणारा ठरावा अशी प्रार्थना केली आहे.

President Ram Nath Kovind, Prime Minister Narendra Modi (Photo Credits: PTI, ANI)

भारतामध्ये भगवान कृष्ण (Lord Krishna) यांचे जन्मस्थळ मानल्या जाणार्‍या मथुरेसह (Mathura) देशभर आज जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. यासाठी मथुरानगरीसह जगभरातील कृष्णाची मंदिरं सजली आहेत. या सणाचं औचित्य साधून ट्विटरच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवी उमंग घेऊन येणारा ठरावा अशी प्रार्थना केली आहे. आज देशभरात जन्माष्टमीचा (Janmashtami)  सण विविध स्वरूपात साजरा केला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात काल रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर आज (24 ऑगस्ट) दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जाणार आहे. Dahi Handi 2019 Wishes: दहीहंडीच्या मराठी शुभेच्छा, ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करा दहिकाला उत्सव

नरेंद्र मोदी ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अबुधाबी मध्ये असून आज त्यांचा मानाच्या पुरस्काराने गौरव होणार आहे. मात्र आज परदेश दौर्‍यावर असलेल्या मोदींनी भारतीयांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रामनाथ कोविंद ट्वीट

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील आज कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळेस भगवतगीतेतील एक महत्त्वाचा श्लोक शेअर करत त्यांनी जन्माष्टमीचा सण भारतीयांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी कामना व्यक्त केली आहे. Lord Krishna Quotes: भगवतगीता द्वारा श्रीकृष्णाने केलेले हे '5' उपदेश बदलू शकतात तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन

सुरेश प्रभू ट्वीट

 देवेंद्र फडणवीस   ट्वीट   

जन्माष्टमी शुभेच्छा  

देशभरात सध्या जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्सहात साजरा केला आहे. महाराष्ट्रात जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी हंडी फोडण्याच्या साहसी खेळाची मोठी परंपरा आहे. यामध्ये मानवी थर रचून हंडी फोडली जाते. महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून हा खेळ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र यंदा या महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे बेघर झालेल्यांना मदत करण्यासाठी अनेक मोठ्या मंडळांनी हा दहीहंडीचा सण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif