Jammu-Kashmir: पाकिस्तानची आणखी एक कुरापत, पानसर येथे BSF जवानांना आढळला 140-150 मीटर लांबलचक गुप्त बोगदा
सीमा सुरक्षा बलातील जवानांना शनिवारी जम्मू मधील हिरानगर सेक्टर येथे पानसर परिसरात पाकिस्तान कडून खणण्यात आलेला आणखी एक गुप्त बोगदा सापडला आहे.
Jammu-Kashmir: सीमा सुरक्षा बलातील जवानांना शनिवारी जम्मू मधील हिरानगर सेक्टर येथे पानसर परिसरात पाकिस्तान कडून खणण्यात आलेला आणखी एक गुप्त बोगदा सापडला आहे. परंतु पाकिस्तानची ही चाल जवानांनी आताच उलथून लावली आहे. या टनलची लांबी 14-0150 मीटर आणि खोली 2-3 फूट असल्याची माहिती IG-BSF च्या एनएस जमवाल यांनी दिली आहे. गेल्या वेळच्या बोगद्याप्रमाणेच हा सुद्धा पाकिस्तानच्या शंक्करगढ येथील परिसरात आढळला असून तो जैश मिलिटेंट्सचा मोठा लॉन्चिंग पॅड आहे.
बीएसएफ कडून याबद्दल अधिक माहिती देत असे सांगण्यात आले आहे की, गुप्त यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बीएसएफच्या तुकड्यांनी जम्मूतील पानसर परिसरात एक अॅन्टी टनलिंग ड्राडव्ह दरम्यान या बोगद्याचा उलगडा केला आहे. बीएसएफकडून सांबा, हिरानगर आणि कठुआ क्षेत्रात गेल्या सहा 6 महिन्यात आढळलेला हा 4 था बोगदा शोधून काढला आहे. तर जम्मू परिसरातील हा 10 वा बोगदा असल्याची माहिती दिली आहे.(Republic Day 2021: Attari border वर यंदा प्रजासत्ताक दिनी Coordinated Parade कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द)
Tweet:
या भोगद्याचा वापर पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी तयार केला होता. पण बीएसएफच्या जवानांनी अवघ्या 10 दिवसातच या दुसऱ्या बोगद्याचा खुलासा केला आहे.(Republic Day Parade 2021: कोरोना विषाणूमुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी नेते उपस्थित नसतील; 55 वर्षांची मोडली परंपरा)
Tweet:
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर बीएसएफच्या जवानांकडून लक्ष ठेवले जात आहे. सेना सातत्याने दहशतावाद्यांचा भारतात घुसखोरी करण्याचा कट उधळून लावत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या मते पाकिस्तान बोगद्यांचे खोदकाम करण्यासाठी इंजिनिअरिंग व्यक्तींची मदत घेत आहे. पण भारतीय सेना पाकिस्तानच्या अशा कुरापतींना वेळोवेळी सडेतोड उत्तर देत आहे.