दक्षिणी कश्मीर च्या बिजबेहरा मध्ये एक CRPF जवान, चिमुकला दहशतवाद्यांकडून ठार

अशी माहिती Central Reserve Police Force कडून देण्यात आली आहे.

Security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

जम्मू कश्मिर मध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा मध्ये त्राल येथील चेवा उलार मध्ये काल संध्याकाळपासून भारतीय सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घाल्ण्यात लष्कराला यश आलं आहे तर दक्षिणी कश्मीर च्या बिजबेहरामध्ये (Bijbehara) एक सीआरपीएफ जवान आणि एक चिमुकला देखील ठार झाला आहे. अशी माहिती Central Reserve Police Force कडून देण्यात आली आहे. जम्मू काश्मीर: त्राल येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतावाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 1 दहशतवाद्याचा खात्मा; शोधमोहिम सुरु.

आज दुपारच्या सुमारास दक्षिण कश्मिरमध्ये बिजबेहरा भागात पदशाही बाग पूल परिसरात दहशतवाद्यांकडून 90 बटालियन सीआरपीएफ च्या एका रोड ओपनिंग पार्टीवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे या हल्ल्यांत दहशतवाद्यांनी एका चिमुकल्याला देखील ठार मारले.

ANI Tweet 

दरम्यान त्रास परिसरामध्ये सीआरपीएफचे जवान, सैन्य आणि पोलिस यांनी काही दहशतवादी लपल्याच्या संशयावरून सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे. आज सकाळपासून चकमक सुरू असून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.