जम्मू कश्मीर: शोपियां भागात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये सुरक्षा जवानांना यश; सर्च ऑपरेशन सुरू
पिंजोरा भागात सुरू असलेल्या या भागातील चकमकीमध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय जवानांना यश आले आहे
जम्मू कश्मीरमध्ये (Jammu & Kashmir शोपियां (Shopian)जिल्ह्यामध्ये आज सोमवार (8 जून) दिवशी सकाळपासूनच पुन्हा दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू झाली आहे. दरम्यान पिंजोरा भागात सुरू असलेल्या या भागातील चकमकीमध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय जवानांना यश आले आहे. जम्मू कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही या भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
काल हिजबुल मुजाहिद्दीनच्या 5 दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आलं आहे. दक्षिण कश्मीर मध्ये रेबन परिसरामध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान अनेक दहशतवाद्यांना घेरण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. मात्र या सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांकडून पोलिसांवर, सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आल्याने त्याच्या प्रत्युत्तरामध्ये त्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
ANI Tweet
दरम्यान भारतीय जवानांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार या सर्च ऑपरेशनला सुरूवात झाली आहे. मागील 24 तासामध्ये सुमारे 9 दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर फारूक अहमद भट्ट याचादेखील खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं आहे. अद्याप या चकमकींमध्ये भारतीय जवानांना नुकसान होण्याची कोणतीही बाब समोर आलेली नाही.