Jammu Kashmir Exit Poll 2024: जम्मू-काश्मीरमध्ये कोणाचे सरकार बनणार? एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून होणार स्पष्ट
भाजपला प्रामुख्याने जम्मू भागात चांगला पाठिंबा मिळाला असला तरी काश्मीर खोऱ्यात अपेक्षित यश मिळालेले नाही.
Assembly Elections 2024 Exit Poll : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुका आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांनंतर आता मतदारांना निकालाची प्रतीक्षा आहे. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. 1 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या 90 जागांवर शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. झाले, त्यामुळे मतदारांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. सध्या आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार या ठिकाणी लोकांनी कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट मत दिलेले नाही.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी केलेल्या इंडिया टुडे-सीव्होटर सर्वेक्षणानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला 27 ते 32 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय काँग्रेसला 40 ते 48 जागा मिळू शकतात. याशिवाय पीडीपीला 6 ते 12 तर इतरांना 4 ते 6 जागा मिळू शकतात.
पीपल्स पल्सच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला 46 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 23 ते 27 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय 7 ते 11 जागा पीडीपीकडे जाऊ शकतात. तर 4 ते 6 जागा इतरांना जाऊ शकतात.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी दैनिक भास्करच्या सर्वेक्षणानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला 35-40 जागा मिळतील, तर भाजपला 20-25 जागा मिळू शकतात. तसेच पीडीपीला 4-7 जागा मिळू शकतात. याशिवाय 12 ते 16 जागा इतरांना जाऊ शकतात.
भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे
एक्झिट पोलनुसार, भाजपला 23 ते 27 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे तो जम्मू आणि काश्मीरमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. भाजपला प्रामुख्याने जम्मू भागात चांगला पाठिंबा मिळाला असला तरी काश्मीर खोऱ्यात अपेक्षित यश मिळालेले नाही.