Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकाबाबत आयोगाची मोठी घोषणा, पाहा कधी होणार मतदान

संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये अंदाजे 87 लाख मतदार आहेत

Election | (Representational Image)

लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका (Jammu Kashmir Election 2024) होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याचे निवडूणक आयोगाने सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. सहा वर्षांपासून येथे विधानसभेची निवडणूक झालेली नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका होणार आहेत. (हेही वाचा - Lok Sabha Elections 2024 Schedule: लोकसभा निवडणूक वेळापत्रक जाहीर, घ्या जाणून किती टप्प्यात मतदान)

भारतीय निवडणूक आयोग द्वारा आज 17 व्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी देत आयोगाने मतदानाच्या तारखाही जाहीर केल्या. त्यानुसार देशभरामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. देशभरातील सर्व ठिकाणचे मतदान झाल्यानंतर सर्व मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी एकाच दिवशी होईल. ही मतमोजणी या दिवशी पार पडेल आणि देशाला नवे सरकार मिळेल.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या पाच आणि लडाखमध्ये एक जागा आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये अंदाजे 87 लाख मतदार आहेत. त्यापैकी 3.4 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 11,629 मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

 

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif