जम्मू-कश्मीर: कुपवाडा येथे होणाऱ्या हिमवादळात 3 जवान शहीद

जम्मू-कश्मीर येथे गेल्या 48 तासांपासून सातत्याने हिमवर्षाव होत आहे. याच दरम्यान आज घाटीमधील कुपवाडा येथे हिमवादळामुळे पाच जवान बर्फाखाली अडकल्याची घटना घडली. यामध्ये बर्फाखाली अकडून 3 जवान शहीद झाले असून अद्याप 1 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Avalanche (Photo Credits-File Image)

जम्मू-कश्मीर येथे गेल्या 48 तासांपासून सातत्याने हिमवर्षाव होत आहे. याच दरम्यान आज घाटीमधील कुपवाडा येथे हिमवादळामुळे पाच जवान बर्फाखाली अडकल्याची घटना घडली. यामध्ये बर्फाखाली अकडून 3 जवान शहीद झाले असून अद्याप 1 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. एलओसीच्या जवळ कुपवाडामधील मच्छल सेक्टर येथे तुफान हिमवर्षाव झाल्याने काही जवान अद्याप बंकरच्या आतमध्ये अडकले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हिमवर्षावामुळे अद्याप जम्मू-कश्मीर येथे लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हिमवादळ आणि पावसामुळे श्रीनगरवर परिणाम झाला आहे. तर जागोजागी बर्फ साचल्याने बाहेर पडणे सुद्धा मुश्किल झाले आहे. श्रीनगर मध्ये बर्फ 6 इंचापर्यंत साचून राहिला आहे. पाऊस आणि हिमवर्षावामुशे जम्मू-कश्मीरच्या तापमानात घट झाली आहे. श्रीनगरचे तापमान शून्य डिग्रीवर गेले आहे. त्याचसोबत विमानांची काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.तसेच कश्मीर मधील गांदरबल जिल्ह्यात सोनमर्ग येथीळ गग्गेनेर क्षेत्राजवळ हिमस्खलन झाल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आगे. या ठिकाणी बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. (जम्मू-कश्मीर: कुलगाम येथे हिजबुल आणि लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसह पोलीस उपअधीक्षकाला ठोकल्या बेड्या)

यापूर्वी सियाचिन येथे तब्बल 18 हजार फूट उंचावर हिमस्खलन झाल्याने भारतीय लष्कराचे 8 जवान बर्फाखाली अडकले होते. ही दुर्घटना ग्लेशिअर येथे घडली होती. दुर्घटना घडली तेव्हा हे आठही जवान या परिसरात गस्त घालत होते. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याबाबत वृत्त देण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement