जम्मू कश्मीर: शेपिया भागात सुरक्षा दलाच्या चकमकीमध्ये 2 दहशतवादी ठार; सर्च ऑपरेशन सुरू
जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतंकवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर जैनापोरा भागातील सुगान गावामध्ये सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे.
केंद्र शासित प्रदेश जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये आज (7 ऑक्टोबर) सकाळी सुरक्षा दल (Security Force) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक सुरू झाली आहे. एका सर्च ऑपरेशन अंतर्गत भारतीय सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याची माहिती जम्मू कश्मीर पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तान कडून मागील 1-2 दिवसांत सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लघन करत फायरिंग करण्यात आलं होतं. यामध्ये सुबेदार सुखदेव शहीद झाले होते. तसेच सोमवारी पंपोर बायपासवर सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यामध्येही 5 जवान जखमी असून दोघांचा मृत्यू झाला आहे. यानंतर शहरांत अनेक ठिकाणी अलर्ड जारी करण्यात आला होता. Terror Attack in Jammu and Kashmir: पुलवामा मध्ये Pampore Bypass जवळ दहशतवादी हल्ला; 2 CRPF जवान शहीद.
दरम्यान आज सकाळपासूनच दहशतवाद्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. मागील काही दिवसांत दिवसा ढवळ्या देखील दहशतवादी हल्ले होत आहेत. सोबतच सीमारेषेवर होणारा अंदाधुंद गोळीबार यामुळे जवानांचे नुकसान झाले आहे.
ANI Tweet
जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतंकवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर जैनापोरा भागातील सुगान गावामध्ये सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. यामध्ये दहशतवाद्यांकडूनही गोळीबार करण्यात आला. दरम्यान चकमकीमध्ये सुरक्षा जवानांनी 2 दहशतवादी ठार केले आहेत.