जम्मू-काश्मीर च्या लोकांना मिळाले नवीन वर्षाचे अमूल्य गिफ्ट; सुरु झाली SMS आणि इंटरनेट सेवा
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व शासकीय रुग्णालयात 31 डिसेंबर 2019 च्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा आणि सर्व मोबाइल फोनवर एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधून 370 कलम (Article 370) हटविल्यानंतर या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमिवर येथील एसएमएस आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे येथील नागरिकांशी प्रचंड त्रस्त झाले होते. मात्र नववर्षाचे औचित्य साधून ही सेवा पुन्हा सुरु केली असल्याची जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित हंसल यांनी दिली. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व शासकीय रुग्णालयात 31 डिसेंबर 2019 च्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा आणि सर्व मोबाइल फोनवर एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.
5 ऑगस्टला कलम 370 (आर्टिकल 370) हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लॅंडलाइन, इंटरनेट आणि शॉर्ट मेसेज सर्व्हिस (एसएमएस) बंद करण्यात आली होती. दरम्यान, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हळूहळू काही भागातील प्रतिबंध हटवण्यात आले होते. आता नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये SMS आणि इंटरनेट सर्व्हिसही सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही बातमी दिली.
हेदेखील वाचा- सरकारकडून अचानक बंद केली जात नाही इंटरनेटची सुविधा, 'ही' प्रक्रिया पूर्ण करावी लागते
नववर्षाच्या स्वागतासाठी तसेच जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना त्यांच्या जवळच्या लोकांशी संवाद साधता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
शासकीय रुग्णालयांसोबत शाळा, महाविद्यालयातही ब्रॉडबॅंड सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. दुसरीकडे, कैद करण्यात आलेल्या नेत्यांची सुटका करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल, अशी माहिती रोहित कंसल यांनी दिली आहे.