Jammu And Kashmir: सोपेरा येथील स्थानिक भाजप नेते मेहराज दिन मल्ला यांचे अपहरण; दहशतवाद्यांवर संशय

जम्मू कश्मीर भाजप प्रवक्त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून भाजप नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. याही अधी स्थानिक भाजप नेत्यांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केल्याची उदाहरणे घडली आहेत.

Jammu And Kashmir | (Photo Credits: ANI/Twitter)

जम्मू कश्मीर (Jammu And Kashmir) येथून भाजप ( BJP ) नेत्याचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे. मेहराज दिन मल्ला (Mehraj Din Malla) असे या नेत्याचे नाव आहेत. मल्ला हे नगरपालिका समितीचे (एमसी) वॉटरगामचे उपाध्यक्ष आहेत. आज (15 जुलै 2020) सकाळी अज्ञात व्यक्तिंनी त्याचे अपहरण केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

वृत्तसंस्था केआयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, काही अज्ञात लोकांनी मल्ला यांचे बुधवारी सकाळी येऊन त्यांच्या राहत्या घरातून अपहरण केले. घरातील अथवा आजुबाजुच्या लोकांनी प्रतिकार करण्यापूर्वीच त्यांचे अपहरण झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. सोपोरचे पोलिस अधीक्षक जाविद इकबाल यांनी केआयएनएसला सांगितले की पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मल्ला यांच्या निवासस्थानाबाहेरील सीसीटीव्ही तसेच इतर परिसरांचाही कसून तपास सुरु आहे. (हेही वाचा, जम्मू काश्मीर: हंदवाडा येथील नौगाम सेक्टर मधील LOC जवळ झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; दोन AK-47 जप्त)

दरम्यान, मेहराज दिन मल्ला यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचा संशय आहे. जम्मू कश्मीर भाजप प्रवक्त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून भाजप नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. याही अधी स्थानिक भाजप नेत्यांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केल्याची उदाहरणे घडली आहेत.

 

दरम्यान, उत्तर काश्मीर येथील बांदीपूर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भाजप नेते वसीम बारी यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांची हत्या केल्याच्या काही दिवसानंतर मल्लाचे अपहरण झाले आहे. ते बांदीपोरा जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष होते. ते वडील आणि भावासोबत त्याच्या दुकानात होते. तेव्हा काही अज्ञात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते.