जम्मू कश्मीर: कुलगाम मधील चिंगम भागात 2 दहशतवाद्यांना सुरक्षा जवानांकडून कंठस्नान

आज (10 ऑक्टोबर) सकाळी कुलगाम (Kulgam)मधील चिंगाम (Chingam) भागात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये यश आलं आहे.

File image of security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

जम्मू कश्मीर (Jammu And Kashmir) या भारतामधील तणावग्रस्त केंद्रशासित प्रदेशामध्ये पुन्हा सुरक्षा जवानांसोबत दहशतवाद्यांची चकमक सुरू झाली आहे. आज (10 ऑक्टोबर) सकाळी कुलगाम (Kulgam)मधील चिंगाम (Chingam) भागात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये यश आलं आहे. दरम्यान ही प्राथमिक माहिती जम्मू कश्मीर पोलिसांनी ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे. या दहशतवाद्यांकडून एक  M4 रायफल आणि पिस्तुल जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान चिंगम भागामध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती मिळताच हा भाग पूर्णपणे बंद आला होता. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू झाले आणि दोघांमध्येही चकमक झाली. दहशतवाद्यांकडूनही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सध्या दोघाजणांना ठार मारण्यात सुरक्षा जवनांना यश आलं आले. हा चकमकीनंतर परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू झालं आहे. Terror Attack in Jammu and Kashmir: पुलवामा मध्ये Pampore Bypass जवळ दहशतवादी हल्ला; 2 CRPF जवान शहीद.

दोन दहशतवादी ठार

काही दिवसांपूर्वी शेपिया भागामध्ये 3 दहशतवादी अशाच प्रकारे ठार करण्यात आले होते. 6 ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरू झालेले सर्च ऑपरेशन दुसर्‍या दिवशी देखील कायम होते. दरम्यान यापूर्वी 5 ऑक्टोबर दिवशी पुलवामामध्ये दक्षिण कश्मिरच्या खोर्‍यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. यामध्ये 5 जण जखमी झाले त्यापैकी उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वारंवार कश्मीर मध्ये दबा देऊन बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.