Kamala Harris nominated for US Vice President: 'भारतीय समुदायासाठी हा ऐतिहासिक दिवस' म्हणत कमला हॅरिस यांचे मामा गोपालन बालाचंद्रन यांनी व्यक्त केला आनंद
भारतीय समुदायासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगत कमला हॅरिस यांचे मामा गोपालन बालाचंद्रन यांनी म्हटले आहे.
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांची अमेरिकेच्या उपराष्ट्रपदी उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर दिल्लीतील (Delhi) त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे. भारतीय समुदायासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे कमला हॅरिस यांचे मामा गोपालन बालाचंद्रन (Gopalan Balachandran) यांनी म्हटले आहे. "आमचं कुटुंब खूप आनंदात आहे. माझी बहिण म्हणजेच कमला यांची आई यांना मुलीचा प्रचंड अभिमान वाटत आहे," असे गोपालन बालाचंद्रन यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. (अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार Kamala Harris नेमक्या कोण? जाणून घ्या त्यांचा भारताशी संबंध ते राजकीय कारकीर्दीचा आढावा)
कमला हॅरिस या कॅलिफोर्निया मधील सिनेटर आहेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांची निवड करण्यात आली आहे. कमला हॅरिस यांच्या या राजकीय भरारीवर अमेरिकन भारतीयांकडूनही आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान यंदाची राष्ट्राध्यक्ष पदासाठी 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
ANI Tweet:
कमला हॅरिस यांच्या आई भारतीय वंशाच्या असून वडील आफ्रिकन आहेत. आई श्यामला गोपालन डॉक्टर तर वडील अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. कमला हॅरिस यांनी हावर्ड युनिव्हर्सिटी मधून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. त्या वकीलही आहेत. डिस्ट्रिक्ट अॅटर्नी जनरल म्हणून त्यांनी 2003 ते 2011 दरम्यान काम पाहिले. 2016 साली त्यांनी अमेरिकन सिनेट मध्ये ज्युनियर रिप्रेसेंटेटिव्ह म्हणून प्रवेश मिळवला.