Israel-Palestine Conflict: इस्राइल-पॅलेस्टाईन मधील संघर्षाचे कश्मीर मध्ये पडसाद

आतापर्यंत या संघर्षात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनान कडून टाकण्यात आलेल्या बॉम्बला उत्तर देण्यासाठी इस्राइलने त्यांच्यावर सुद्धा 22 बॉम्ब हल्ले केले.

Indian Army | (File photo)

Israel-Palestine Conflict:  इस्राइल आणि पॅलेस्टाईन दरम्यान एका आठवड्याहून संघर्ष सुरु आहे. आतापर्यंत या संघर्षात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनान कडून टाकण्यात आलेल्या बॉम्बला उत्तर देण्यासाठी इस्राइलने त्यांच्यावर सुद्धा 22 बॉम्ब हल्ले केले. लेबनान नुसार इस्राइलने त्यांच्यावर 22 बॉम्ब टाकले आहेत. तर इस्राइलचे असे म्हणणे आहे की, प्रथम दक्षिण लेबनान यांच्याकडून हल्ला करण्यात आला. दोन्ही देशांमध्ये हजारो किलोमीटर दूर बॉम्ब हल्ले केले जात असले तरीही या संघर्षाचे पडसाद आता कश्मीर मध्ये दिसून येत आहेत.

या देशांमधील संघर्षामुळे भारतीय सुरक्षा एजेंसीकडून अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार कश्मीर मध्ये मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. आमच्या गुप्त एजेंसीचे असे म्हणणे आहे की, कश्मीर घाटी मध्ये दहशतवादी संघटेकडून इस्रालमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर हल्ला केला जाऊ शकतो. गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवागी आईईडी किंवा स्फोटक लावून हल्ला करु शकतात. घाटी मध्ये या संबंधित 3 वर्ष जुना एक व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.(Israel-Palestine Conflict: गाझा येथे पुन्हा एकदा एअरस्ट्राइक, पहाटेच्या वेळेस इज्राइलच्या लढाऊ विमानांतून 10 मिनिटांपर्यंत बॉम्ब हल्ले)

सुरक्षा एजेंसिकडून सुरक्षा बलाला या धोक्यापासून बचाव करण्यासाठी कठोर चेतावणी दिली आहे. असे म्हटले आहे की,जो कोणीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. सुरक्षा बलाला सल्ला दिला आहे की, त्यांनी या धोक्यापासून बचाव करण्यासाठी नव्या ड्रिल आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्याचसोबत सुरक्षा बलाला स्निफर डॉग्सचा सुद्धा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तर जम्मू-कश्मीर मध्ये पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांना कठोर सुचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून सोशल मीडिया ते संवेदनशील ठिकाणांवर लक्ष असणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif