कोरोना गायत्री मंत्रामुळे ठिक होतो? केंद्र सरकारच्या मदतीने AIIMS ऋषिकेश करतायत रिसर्च
याच दरम्यान अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, ऋषिकेश (AIIMS Rishikesh) कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर सामान्य उपचारांशिवाय गायत्री मंत्राचा जाप आणि प्राणायम केल्याच्या प्रभावासंदर्भात संशोधन करत आहेत.
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच दरम्यान अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, ऋषिकेश (AIIMS Rishikesh) कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर सामान्य उपचारांशिवाय गायत्री मंत्राचा जाप आणि प्राणायम केल्याच्या प्रभावासंदर्भात संशोधन करत आहेत. एम्स ऋषिकेशसह मिळून केंद्र सरकारला हे जाणून घ्यायचे आहे की, खरंच गायत्री मंत्रमुळे कोरोनाचा ठिक होतो का? विज्ञान मंत्रालयाकडून करण्यात येणाऱ्या या अभ्यासामागे एक उद्दीष्ट आहे. त्यामुसार मंत्र आणि प्राणायमाचा कोरोनावर प्रभाव होतो.
हा अभ्यास 20 रुग्णांवर करण्यात आला. तर 14 दिवस करण्यात येणाऱ्य या ट्रायलमध्ये रुग्णांच्या शरीरात होणारे बदलावांचा तपास करण्यात येणार आहे. रुग्णांचा A आणि B गटात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटातील लोक सामान्य उपचारासह सकाळ संध्याकाळ प्राणायम आणि गायत्री मंत्राचा जाप करत आहेत. तर दुसऱ्या गटातील लोक कोरोना पासून बचाव करण्यासाठी उपचार घेत आहेत.(Covid-19 Vaccination in India: आतापर्यंत 4,20,63,392 लसींचे डोस देण्यात आले- आरोग्य मंत्रालय)
14 दिवसानंतर या दोन्ही समूहातील रुग्णांच्या शरीरावर येणाऱ्या बदलावांवर रिसर्च केला जाणार आहे. त्यानंर दोन्ही समूहातील रुग्णांमध्ये तुलना करत हे पाहिले जाणार आहे की, सामान्य रुग्णांच्या उपचारासह गायत्री मंत्रांचा जाप आणि प्राणायम केलेल्यांमध्ये काय फरक आहे. हा अभ्यास भारत सरकरच्या विज्ञान आणि प्रोद्योगिक विभागाद्वारे आयोजित करण्यात आला आहे. एम्स मध्ये प्रिंसिपल इन्वेस्टिगेटर डॉ. रुचि दुआ यांनी असे सांगितले की, रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांमध्ये गायत्री मंत्र आणि प्राणायमाचा प्रभाव पाहण्यासाठी हा एक पायलट अभ्यास आहे.