IRCTC Luggage Rules: रेल्वे प्रवाशांवरही सामान सोबत नेण्यावर मर्यादा; अधिक लगेज घेऊन प्रवास करताना आढळल्यास होणार दंड

एसी फर्स्ट क्लासमध्ये 70 किलोग्रॅमपर्यंत मोफत आणि एसी सेकंड क्लासमध्ये 50 किलोग्रॅमपर्यंत मोफत लगेजला परवानगी आहे.

Representative Image (Pic Credit- PTI)

भारतीय रेल्वे प्रवासादरम्यान आता अधिकचं सामान घेऊन जाणं प्रवाशांसाठी महाग होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून आता करण्यात आलेल्या आवाहनानुसार, रेल्वे प्रवास करताना आता आपल्यासोबत कमीत कमी आणि आवश्यक तेवढेच सामान ठेवावे. अधिकच्या सामानासह आढळल्यास तुम्हांला सामान्य दरांच्या सहापट दंड केला जाणार आहे. प्रवाशाने प्रस्थान वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी बुकिंग स्टेशनच्या लगेज ऑफिसमध्ये सामान सादर केले पाहिजे. तिकीट बुक करताना तुम्ही सामानही (luggage) बुक करू शकता. हे देखील नक्की वाचा: Indian Railway-IRCTC: रात्रीच्या रेल्वे प्रवासात हा नियम ठेवा ध्यानात, TT अजीबात करणार नाही झोपमोड; जाणून घ्या काय आहे नियम? 

दंड न आकारता किती लगेज/सामान घेऊन जाऊ शकता?

एसी फर्स्ट क्लासमध्ये 70 किलोग्रॅमपर्यंत मोफत आणि एसी सेकंड क्लासमध्ये 50 किलोग्रॅमपर्यंत मोफत लगेजला परवानगी आहे. AC 3-टिअर स्लीपर, AC चेअर कार आणि स्लीपर क्लासमध्ये 40 किलोग्रॅमपर्यंतचे सामान नेण्याची परवानगी आहे. सेकंड क्लाससाठी मर्यादा 25 किलोग्रॅम पर्यंत आहे. किमान सामान शुल्क 30 रुपये आहे.

पहा ट्वीट

अधिकचं सामान असल्यास आणि तुम्हांला ते सामान त्याच ट्रेनने न्यायचे असल्यास बुकिंग स्टेशनवरील सामान कार्यालयात ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी देणं आवश्यक आहे. तिकीट खरेदी करताना प्रवासी त्यांचे सामानही आरक्षित करू शकतात.