रेल्वे प्रवास करताना ओळखपत्र बाळगण्यापेक्षा mAadhaar ID चा वापर करा, कोणताच अडथळा येणार नाही
तर रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना यापूर्वी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक होते. मात्र आता नव्या नियमांनुसार प्रवाशांना त्यांचे ओखळपत्र बाळगण्याची गरज भासणार नाही.
IRCTC ने रेल्वे तिकिटासाठी लागू होणाऱ्या नियमात बदल केले असल्याची माहिती दिली आहे. तर रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना यापूर्वी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक होते. मात्र आता नव्या नियमांनुसार प्रवाशांना त्यांचे ओखळपत्र बाळगण्याची गरज भासणार नाही. तर प्रवाशांनी mAadhaar ID चा उपयोग करुन रेल्वेने प्रवास करता येणार आहे. या आयडी कार्डमुळे तुम्हाला प्रवासादरम्यान कोणताच अडथळा येणार नसल्याचे सांगितले आहे.
तर mAadhaar, eAadhaar, वाहन परवाना हे आता प्रवाशांना त्यांची ओळख म्हणून वापरता येणार आहे. तसेच या आयडीचे वेरिफिकेशन प्रवाशांना mAadhaar App च्या सहाय्याने करता येणार आहे. यामुळे तुम्हाला तुमचे आधार कार्ड सहजरित्या उपलब्ध होणार आहे. तसेच अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागणार आहे.
सध्या महाआधार हे अॅप फक्त अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर आयओससाठी अद्याप हे अॅप उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. त्याचसोबत eAadhaar ही आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत असणार आहे.