Theft For GF Birthday: गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी चोरी! नववीच्या विद्यार्थ्याने आईचे दागिने विकून प्रेयसीला गिफ्ट केला आयफोन

तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही तपासण्यात आले मात्र तपासात महिलेच्या घराच्या आजूबाजूला कोणतीही संशयास्पद हालचाल नसल्याचे आढळून आले.

Arrest | (Representative Image)

iPhone Theft For GF Birthday: दक्षिण पश्चिम दिल्लीतील (Delhi) नजफगढ परिसरातून एक चोरीची (Theft) विचित्र घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका नववीच्या वर्गातील विद्यार्थ्याने आपल्या गर्लफ्रेंडला आयफोन (iPhone) गिफ्ट करण्यासाठी चक्क आपल्या आईचे दागिने चोरले. हे दागिने विकून आलेल्या पैशांतून त्याने आयफोन घेतला व गर्लफ्रेंडला तिच्या वाढदिवसाला भेट म्हणून दिला. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्याच्या आईने याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आईने घरात चोरी झाल्याबाबतचा एफआयआर दाखल केला होता व त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, हा  अल्पवयीन मुलगाच दोषी आढळला. या आरोपी मुलाने आपल्या आईचे दागिने काकरोळा परिसरातील दोन वेगवेगळ्या दुकानदारांना विकले होते.

पोलिसांनी सांगितले की, एफआयआरनुसार दोन सोनसाखळ्या, एक जोड कानातले आणि सोन्याची अंगठी चोरीला गेले होते. तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही तपासण्यात आले मात्र तपासात महिलेच्या घराच्या आजूबाजूला कोणतीही संशयास्पद हालचाल नसल्याचे आढळून आले. यानंतर शेजाऱ्याची चौकशी करण्यात आली. मात्र ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी घरातील सदस्यांवर लक्ष केंद्रित केले.

कथित चोरीच्या घटनेनंतर महिलेचा मुलगा घरी परत आला नसल्याचे समजले. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याच्या मित्रांशी संपर्क साधला असता त्याने 50 हजार रुपयांना नवीन आयफोन खरेदी केल्याचे समजले. आरोपी विद्यार्थ्याला पकडण्यासाठी पोलिसांनी धरमपुरा, काक्रोला आणि नजफगडमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. मात्र प्रत्येक वेळी हा मुलगा पोलिसांना चकवा देत राहिला. त्यानंतर संध्याकाळी 6.15 च्या सुमारास पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला त्याच्या घराजवळ पाहिले. त्यावेळी त्याल;आ पकडण्यात आले. (हेही वाचा: Vadodara Shocker: गुजरातमध्ये दिवसाढवळ्या ड्रेन कव्हरची चोरी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल)

झडतीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून आयफोन जप्त केला. सुरुवातीला आरोपी विद्यार्थ्याने आपला सहभाग नाकारला. मात्र पोलिसांनी कडक चौकशी केली असता, त्याने आपणच आईचे दागिने दोन सोनारांना विकल्याची कबुली दिली. आरोपी विद्यार्थ्याच्या मित्रांनी सांगितले की, तो त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने आईचे दागिने चोरले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif