Hemant Soren ED Interrogation: मनी लाँड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी
जानेवारी 16 ते 20 जानेवारीदरमयान त्यांनी चौकशीसाठी उपलब्ध रहावे, असं एका पत्रातून सांगितलं होते.
झारखंडमध्ये (Jharkhand) मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीचं (ED) पथक मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या निवासस्थानीदाखल झाले आहे. यामुळे कोणताही अनुचितप्रकार होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल 1000 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंदन कुमार सिन्हा यांनी सांगितलं. रांची प्रशासनाने तपास यंत्रणेचे कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.
पाहा व्हिडिओ -
मुख्यमंत्री सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने 13 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. जानेवारी 16 ते 20 जानेवारीदरमयान त्यांनी चौकशीसाठी उपलब्ध रहावे, असं एका पत्रातून सांगितलं होते. ईडीच्या पत्राला सोरेन यांनी उत्तर दिलं होतं. सोरेन यांनी आपण 20 जानेवारी उपलब्ध असून ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी येऊन जबाब नोंदवू शकतात, असं सांगितलं होते.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी केली जाणार असल्याने अनेक आदिवासी संघटनांनी शुक्रवारी केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात आंदोलन केले होते.