International Yoga Day 2019: नरेंद्र मोदी योग सीरिजमध्ये आज शिका शलभासन, कंबरेचे आजार करा कायमचे दुर (Watch Video)
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योग व्हिडिओ सिरीज मध्ये आज शलभासनाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या आसनामुळे स्पोंडिलोसिस आजरावर उत्तम उपचार होतो असे सांगत मोदींनी याचा सराव करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिना (International Yoga Day 2019) निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरु केलेल्या ऑनलाईन योग व्हिडिओ सिरीज मध्ये आज शलभासन (Shalbhasana) आसनाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ मध्ये मोदींनी शलभासनाचे महत्त्व , फायदे आणि आसनाची कृती सांगितली आहे. 5 जून पासून सुरु केलेल्या या सिरीजमधील हे तेरावे आसन आहे.
शलभासन हे स्पोंडिलोसिस या कंबरेच्या आजरांपासून सुटका देण्यासाठी ओळखले जाते. या आसनात अंतिम स्थितीत शरीराचा आकार हा जमिनीवर बसलेल्या टोळाप्रमाणे (शलभ) वाटतो. वर उचललेले पाय टोळाच्या शेपटीच्या भागाप्रमाणे वाटतात. म्हणून या आसनास ‘शलभासन’ असे म्हणतात. महिलांनी या आसनाचा नित्य सराव केल्यास मासिक पाळीच्या वेदनांचा त्रास कमी होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगासनं करतानाचे अॅनिमेडेट व्हिडिओज सोशल मीडियावर हिट; Yoga Day ची जय्यत तयारी
नरेंद्र मोदी शलभासन व्हिडीओ
2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेतील आपल्या भाषणात मोदींनी दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देत 21 जून हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून 21 जून हा दिवस 'योगदिन' म्हणून साजरा केला जातो. मात्र अद्यापही अनेक नागरिक या आरोग्यवर्धक सवयींकडे दुर्लक्ष करताना पाह्यला मिळतात, या मंडळींना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी मोदींनी यंदा हा ऑनलाईन उपक्रम सुरु केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)