International Yoga Day 2019 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली उष्ट्रासनाची माहिती (Watch Video)
21 जून रोजी जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन योग सिरीज सुरु केली आहे.
21 जून रोजी जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'जागतिक योग दिना'निमित्त (International Yoga Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऑनलाईन योग सिरीज सुरु केली आहे. या सिरीजच्या माध्यमातून ते दररोज एक नवे आसन विधीवत कसे करावे आणि त्याचे फायदे समजावून सांगत आहेत. योगाचा प्रचार व त्याविषयी जनजागृती करण्याचा मोदींचा हा एक प्रयत्न आहे. 5 जून पासून ही ऑनलाईन योग सिरीज सुरु करण्यात आली असून आज यातील सहाव्या आसनाचा व्हिडिओ मोदींनी शेअर केला आहे. पहा आजचे नवे आसन... (तुम्ही पादहस्तासन करता का? असा प्रश्न विचारत नरेंद्र मोदी यांनी दिले योगासनांचे धडे)
नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
व्हिडिओच्या माध्यमातून आसन कसे करावे आणि त्याचे महत्त्व अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. याचा नागरिकांना नक्कीच फायदा होईल.