Insurance Scam in Union Territory: केंद्रशासित प्रदेशातील कथित विमा घोटाळ्याची चौकशी; सीबीआयचे पथक सत्यपाल मलिक यांच्या निवास्थानी दाखल
या मुलाखतींमध्ये त्यांनी विद्यमान केंद्र सरकारची पोलखोल केली आहे. खास करुन मलिक यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापार आणि रविश कुमार यांना स्वतंत्रपणे दिलेल्या मुलाखतींवरुन देशभरात चर्चा झाली.
जम्मू कश्मीर राज्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक ( Satya Pal Malik) यांच्या निवास्थानी सीबीआयचे (CBI) एक पथक दाखल झाले आहे. केंद्रशासित प्रदेशातील ( Union Territory) कथीत विमा घोटाळा (Insurance Scam in Union Territory) प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हे पथक मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने केंद्रशासित प्रदेशातील कथित विमा घोटाळ्याच्या संदर्भात चौकशीसाठी या आधीच समन्स बजावले आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (21 एप्रिल) रोजीच ही माहिती दिली होती.
दरम्यान, सीबीआयद्वारा प्राप्त समन्सवर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सीबीआयने "काही स्पष्टीकरणांसाठी" दिल्लीतील एजन्सीच्या अकबर रोड गेस्टहाऊसमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यांना (सीबीआय) काही स्पष्टीकरण हवे आहेत ज्यासाठी त्यांना माझी उपस्थिती हवी आहे. मी राजस्थानला निघालो आहे, म्हणून मी त्यांना 27 ते 29 एप्रिलपर्यंतच्या तारखा दिल्या असल्याचे मलिक यांनी म्हटले.
सत्यपाल मलिक यांनी काही युट्युब चॅनल्स आणि स्वतंत्र प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतींमध्ये त्यांनी विद्यमान केंद्र सरकारची पोलखोल केली आहे. खास करुन मलिक यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापार आणि रविश कुमार यांना स्वतंत्रपणे दिलेल्या मुलाखतींवरुन देशभरात चर्चा झाली. मोदी सरकार अडचणीत आले. या पार्श्वभूमीवर सत्यपाल मलिक यांना पाठवलेल्या समन्सकडे पाहिले जात आहे. (हेही वाचा, Diamond Jubilee Celebrations of CBI: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं CBI च्या हीरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन, Watch Video)
ट्विट
दरम्यान, मी केंद्र सरकारची पापे उघड केली आहेत. कदाजित त्यामुळेच मला सीबीआयचे बोलावणे आले असेल. पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी घाबरणार नाही. मी सत्याच्याच बाजूने उभा राहिलो आहे आणि राहणारही आहे, असे मलिक यांनी म्हटले.