Independence Day 2020: लडाखच्या इंडो तिबेट सीमा जवानांनी 14,000 उंचीवर ध्वजारोहण करुन साजरा केला भारतीय स्वातंत्र्य दिन; Watch Video
त्यानंतर परेड देखील केले. हा कार्यक्रम डोळ्यांचे पारणं फेडेल असाच होता.
आजचा 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 73 वर्षांपूर्वी म्हणजेच 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा यंदा 74 वा वाढदिवस आपण साजरा करत आहे. हा सुवर्ण दिवस पाहण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिले त्यांना स्मरण्याचा हा दिवस. म्हणूनच हा देशभर ध्वजारोहण केले जाते. तिरंग्याला सलाम करून या शूरवीरांचे स्मरण केले जाते. म्हणूनच लडाखच्या सीमेवर असलेल्या इंडो तिबेटीयन जवानांनी देखील 14000 फूट उंटीवर असलेल्या पांगाँग त्सो किना-यावर ध्वजावंदनाचा कार्यक्रम केला.
लडाखच्या सीमेवर असलेल्या इंडो-तिबेट सीमा जवानांनी (ITBP)जवानांनी जमिनीपासून 14000 फूट उंचीवर असलेल्या पांगाँग त्सो किना-यावर ध्वजारोहनाचा कार्यक्रम करुन तिरंग्याला सलामी दिली. त्यानंतर परेड देखील केले. हा कार्यक्रम डोळ्यांचे पारणं फेडेल असाच होता.
पाहा ANI चा व्हिडिओ:
आज संपूर्ण देश 74 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करत आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सकाळी 7.30 वाजता लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. "कोविड-19 च्या संकटात 130 कोटी भारतीयांनी स्वावलंबी होण्याचा आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प मनावर घेतला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत हा सर्वांचा मंत्र बनला आहे." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.